विरारवाल्यांना लाभ, वसईकरांची डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:01 PM2018-10-31T23:01:44+5:302018-10-31T23:02:27+5:30
गेली सहा वर्षे सकाळच्या वेळी वसई रोड रेल्वे स्थानकातून सुटणारी ९.५७ ची महिला विशेष ट्रेन मधून हजारो महिला प्रवासी प्रवास करित असतात. मात्र, गेल्या महिन्यात पश्चिम रेल्वेकडून अचानक ही विशेष गाडी १ नोव्हेंबर २०१८ पासून विरारहून सोडण्यात येईल असे जाहिर करण्यात आले.
नालासोपारा : गेली सहा वर्षे सकाळच्या वेळी वसई रोड रेल्वे स्थानकातून सुटणारी ९.५७ ची महिला विशेष ट्रेन मधून हजारो महिला प्रवासी प्रवास करित असतात. मात्र, गेल्या महिन्यात पश्चिम रेल्वेकडून अचानक ही विशेष गाडी १ नोव्हेंबर २०१८ पासून विरारहून सोडण्यात येईल असे जाहिर करण्यात आले. विरारच्या प्रवाशांची तशी मागणी असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे वसई, नायगांव परिसरातील महिला प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे.
कारण या महिला स्पेशल लोकलच्या वेळेनुसार अनेक नोकरदार महिलांनी आपल्या आॅफीस व कामाच्या वेळा बदलून घेतल्या होत्या. तसेच विरारहून सुटणाऱ्या इतर लोकलमधील महिलांच्या डब्यात प्रचंड गर्दी होत असल्यामुळे वसई रोड व नायगांव स्थानकातील महिला प्रवाशांना डब्यात चढणे शक्य होत नाही. याबाबत महिला प्रवाशांच्या शिष्टमंडळासह १६ आॅक्टोबर रोजी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांची भेट घेत वसई रोड रेल्वे स्थानकातून सुटणारी महिला स्पेशल विरारहून सोडण्याअगोदर एक सर्वे करून माहिती मागविण्याची विनंती केली होती. त्यानुसार रेल्वे प्राधिकरणाच्या १५ अधिकाºयांनी २२ व २७ आॅक्टोबर २०१८ रोजी सर्वे करून तो अहवाल रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांना सादर केला होता.
१ नोव्हेंबर २०१८ पासून अचानक ही लोकल विरारहून करण्यात येणार असल्याच्या वृत्तामुळे महिला प्रवाशी प्रचंड नाराज झाल्या आहेत. ही महिला विशेष लोकल विरारहून सोडण्यात यावी की, नाही याबाबत २२ ते २७ आॅक्टोबर दरम्यान एक सर्वे केला गेला होता. त्यावेळी लोकल ट्रेनमध्ये ६ ते ७ महिला टी सी चढून महिला प्रवासी किती प्रवास करीत आहेत, तसेच बसलेल्या महिला व उभ्या असलेल्या महिलांच्या नोंदी तसेच प्रत्येक स्थानकावर चढ-उतार करणाºया प्रवाशांच्या नोंदी करीत होत्या. मात्र या नोंदी व्यतीरिक्त त्यांच्याकडून रेल्वेसंदर्भात समस्या किंवा महिला लोकल विरारहून सोडण्यात आल्यास काय त्रास होईल याबाबत विचारणा झाली नाही.
अहवाल काय म्हणतो...
या अहवालात या महिला स्पेशल ट्रेन मध्ये बोरिवली स्थानकापर्यंत २५३८ महिला प्रवासी चढत असून दादर स्थानकापर्यंत १४३८ प्रवासी प्रवास करत असल्याचे नमूद केले.
तसेच, इतर सामान्य लोकलमध्ये खरेदीच्या वेळी हिच संख्या ६००० असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामूळे ही महिला विशेष लोकल विरार स्थानकातून सोडणे योग्य असल्याचा निर्णय रेल्वे प्राधिकरणाने देत त्यावर शिक्कामोर्तब केला.