पालघर उपनगराध्यक्षपदी उत्तम घरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 11:03 PM2019-04-23T23:03:05+5:302019-04-23T23:03:15+5:30

दोन वर्षे सेनेला तर भाजपला तीन; नगराध्यक्षपद गेल्याने अजूनही घडी बसेना

Best house at Palghar suburban | पालघर उपनगराध्यक्षपदी उत्तम घरत

पालघर उपनगराध्यक्षपदी उत्तम घरत

googlenewsNext

पालघर : नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेने कडून उत्तम घरत तर भाजप कडून लक्ष्मीदेवी हजारी या इच्छुकांनी भरलेल्या नामनिर्देशन पत्रा नंतर हजारी यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने उत्तम घरत यांची एकमताने निवड झाली आहे.
पालघर नगर परिषदेच्या निवडणुकी दरम्यान सेना-भाजप युती प्रमाणे नगराध्यक्षपद सेनेकडे तर उपनगराध्यक्षपद भाजप कडे तसेच दोन विषय समित्या व दोन स्विकृत सदस्य भाजप कडे राहतील असे ठरल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र नगराध्यक्ष पदी महाआघाडी च्या डॉ. उज्वला काळे यांची निवड झाल्याने एकहाती सत्ता मिळवूनही नगराध्यक्ष पद हातचे गेल्याने सेने पुढच्या अडचणी वाढल्या होत्या.

नगरपरिषदेत एकूण २८ नगरसेवक निवडून आले असून शिवसेना १४, भाजप ७, सेना बंडखोर ५ तर राष्ट्रवादी २ असे बलाबल राहिले आहे. तूर्तास तरी दोन वर्ष नगरपरिषदेचे उपनगराध्यक्षपद उत्तम घरत सांभाळणार असून याआधीही उत्तम घरत यांनी पालघर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्षपद भूषिवलेले होते. सलग पाच टर्म ते नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत.

उपनगराध्यक्ष पाठोपाठ स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपचे अरु ण माने यांची पालघर नगर परिषदेमध्ये वर्णी लागली आहे. सेना-भाजपमध्ये ठरल्याप्रमाणे एकूण तीन स्वीकृत नगरसेवक घ्यावयाचे होते त्यापैकी दोन नगरसेवक हे भाजप तर एक नगरसेवक शिवसेना असे ठरले होते. मात्र शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक कोण असतील याबाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्याची काळजी सेनेने घेतली. शिवसेनेच्या कोणत्याही उमेदवाराने स्वीकृत नगरसेवक साठी अर्ज दाखल केला नसल्याने अजून शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक कोण हे निवडणुकी नंतर जाहीर होणार आहे. मात्र, त्याची चुरस सुरु झाली आहे.

अखेर झाला समझोता
आज उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत सेने कढून उत्तम घरत तर भाजप कडून लक्ष्मीदेवी हजारी यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.
उपनगराध्यक्षपदी शिवसेना व भाजपामध्ये चढाओढ होती अखेर वरिष्ठांच्या समझोत्या नुसार पहिली दोन वर्षे शिवसेनेला मिळणार असून अन्य तीन वर्षांचा कालावधी भाजपला देण्यात येणार आहे.

Web Title: Best house at Palghar suburban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :palgharपालघर