भागवत यांची नियुक्ती वादग्रस्त; जि.प. अध्यक्षांची पंकजांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 02:59 AM2018-07-31T02:59:18+5:302018-07-31T02:59:28+5:30

या प्रशिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (DIECPD) स्थापन झालेली असून या संस्थेकडे शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात निधी येत असतो.

Bhagwat's appointment is controversial; Zip President's complaint to Pankaj | भागवत यांची नियुक्ती वादग्रस्त; जि.प. अध्यक्षांची पंकजांकडे तक्रार

भागवत यांची नियुक्ती वादग्रस्त; जि.प. अध्यक्षांची पंकजांकडे तक्रार

googlenewsNext

- हितेन नाईक

पालघर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वादग्रस्त ठरलेल्या तत्कालीन शिक्षणाधिकारी संगीता भागवत ह्यांची बदली ठाणे येथे करण्यात आली असतांना त्यांच्याकडे पालघरच्या जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास  (DIECPD ) ह्या संस्थेचा कारभार सोपविण्यात आल्याने जिल्हापरिषद अध्यक्ष विजय खरपडे हे पंकजा मुंडे कडे तक्र ार करणार आहेत.
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक ,माध्यमिक शिक्षकांची विविध प्रशिक्षणे वर्षभर सुरू असतात. या प्रशिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (DIECPD) स्थापन झालेली असून या संस्थेकडे शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात निधी येत असतो. जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी हेच या प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य असून शिक्षकांचे प्रशिक्षण घेणे व शासनस्तरावरून येणारा मोठा निधी खर्च करणे ही सर्वस्वी त्यांची जबाबदारी असते.मे २०१८ मध्ये झालेल्या प्रशासकीय बदल्यांमध्ये पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांची ठाणे जिल्हा परिषद मध्ये बदली होवून त्या ठाणे येथे रु जू झाल्या आहेत. तर पालघर येथे प्राथमिक शिक्षणाधीकारी पदावर माध्यमिक शिक्षणाधिकारी असलेले राजेश कंकाळ ह्यांनी कार्यभार स्वीकारला आहे.त्यामुळे नियमानुसार पालघर जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य पद शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांच्याकडे येणे अपेक्षित होते. परंतु बदली झाल्यानंतरही ठाणे शिक्षणाधीकारी संगीता भागवत यांनी पालघर प्रशिक्षण संस्थेचा पदभार आजही सोडलेला नाही.त्यांचा पालघर मधील प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा कार्यकाळ खूपच वादग्रस्त राहिला असून शिक्षक संघटनांनी शिक्षकांच्या बदल्या, रजा मंजुरी, आदी प्रकरणात पैशाची मागणी होत असल्याचा आणि पैसे स्वीकारण्यासाठी काही शिक्षकांना दलाल म्हणून नेमल्याचा आरोप करून शिक्षक संघटनांनी त्यांच्या कार्यालयासमोर भीक मांगो आंदोलन केले होते. त्यातून जमलेला पैसा शिक्षण विभागाकडे देऊन निषेधही करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या विरोधात तक्र ार करणाऱ्या शिक्षकांच्या शाळांना मुद्दाम भेटी देऊन त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न त्यांच्या कडून केला जात होता.त्यामुळे शिवसेनेच्या मुंबई मधील शिक्षक संघटनांच्या पदाधिकाºयांनी भागवत ह्यांना पत्र देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता.
त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षक प्रशिक्षण दर्जेदार होण्यासाठी व कामकाजात सुसुत्रता येण्यासाठी पालघर शिक्षक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य पद लवकरात लवकर राजेश कंकाळ यांच्याकडे सोपविण्यात यावे अशी मागणी पालघर जि. प. सदस्यांनी केली आहे.

मी पालघर मध्ये कार्यरत असताना डायप (DIECPD) चे काम चांगले केल्याने संचालकांनी (SERT) या संस्थेचे काम माङयाकडे सोपविले आहे.सध्या मला रिव्हाईज आॅर्डर पदनिर्मिती प्रक्रि या पूर्ण होई पर्यंत देण्यात आली आहे.
-संगीता भागवत, शिक्षणाधिकारी,ठाणे जिल्हापरिषद

जिल्हापरिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत या निवडीचे पडसाद उमटून त्यांना विरोध दर्शविण्यात आला आहे.मी उद्या मंत्रालयात जात असून पंकजाताई मुंडे च्या कानी हे प्रकरण घालणार आहे.
-विजय खरपडे, अध्यक्ष जि.प.,पालघर

Web Title: Bhagwat's appointment is controversial; Zip President's complaint to Pankaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.