भाईंदरला होणार चार सरकते जिने, राजन विचारे यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 07:11 AM2018-12-16T07:11:33+5:302018-12-16T07:11:56+5:30
राजन विचारे यांची माहिती : रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत बैठक
मीरा रोड : भाईंदर रेल्वे स्थानकातील पादचारी पूल व रेल्वे फलाटावर मिळून चार नवीन सरकते जिने बसवण्याचे मंजूर झाले आहेत. पश्चिम रेल्वेचे उपमहाव्यवस्थापक मुकुल जैन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे खासदार राजन विचारे यांनी सांगितले.
जैन यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत प्रवाशांना भेडसावणाºया समस्यांचे निवारण करण्यासाठी चर्चा करण्यात आली. गर्दीच्यावेळी नागरिकांना खास करून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला प्रवाशांसाठी सरकते जिने सर्व फलाटांवर असणे आवश्यक असल्याने ते बसविण्याची गरज आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सरकते जिने उभारण्याचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा अशी मागणी विचारे यांनी बैठकीत केली. यावेळी जैन यांनी नियोजित जिन्यापैकी तीन सरकत्या जिन्यांची कामे लवकरच पूर्ण होतील. तसेच रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी चार नवीन सरकते जिने उभारण्यास मंजुरी दिल्याचे विचारे म्हणाले. नवीन जिने बसवण्याची कामे मार्चपर्यंत पूर्ण होतील. भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूकडील पादचारी पुलांवर दोन सरकते जिने बसवले जाणार आहेत. उत्तर दिशेच्या पूलाजवळ एक तर दक्षिण दिशेच्या पूलाजवळ एक सरकता जिना बसवला जाणार आहे.
बालाजीनगरच्या पुलाला अतिरिक्त जिना
या शिवाय फलाट क्र मांक एक व दोनवरून दक्षिण दिशेच्या म्हणजेच बालाजीनगरच्या पादचारी पुलाला जोडून एक अतिरीक्त सरकता जिना बसवला जाणार आहे . तर फलाट क्र मांक सहावर मध्यभागी असलेल्या पादचारी पुलाला जोडून एक सरकता जिना बसवण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे असे विचारे म्हणाले.