बचत गटाला भातलागवड मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 02:06 AM2017-07-18T02:06:38+5:302017-07-18T02:06:38+5:30

पालघर जिल्हा कृषी विभाग व पंचायत समिती जव्हार यांच्या सहकार्याने तालुक्यातील देहेरे गावातील आदिवासी महिला संघाला ९० टक्के अनुदानावर भात

Bhatlagavadha machine for saving group | बचत गटाला भातलागवड मशीन

बचत गटाला भातलागवड मशीन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : पालघर जिल्हा कृषी विभाग व पंचायत समिती जव्हार यांच्या सहकार्याने तालुक्यातील देहेरे गावातील आदिवासी महिला संघाला ९० टक्के अनुदानावर भात लागवडीचे मशीन देण्यात आले आहे.
यामुळे तासाभरात १ एकरात भाताची लागवड करणे शक्य होईल. असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे या मशीनने रोज लागवड सुरु असून, एका तासाचा दर ८०० रु पये ठरविण्यात आला आहे.
यामुळे लागवड लवकर होत असल्याने त्याची मागणी वाढत असल्याचे संघाने सांगितले. यामुळे आम्हाला लागवड कमी वेळात करणे सहज शक्य झाले आहे. यामुळे रोजगार देखील वाढला आहे.
त्याचे उदघाटन देहेरे येथे पालघर जिल्हा कृषी विभाग अधिकारी व जव्हार पंचायत समिती सभापती आणि गटविकास अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालघर कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी व पालघर जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग समिती सभापती अशोक वडे, जव्हार पंचायत समिती सभापती ज्योतीताई भोये, जव्हार गटविकास अधिकारी सुनीलकुमार पठार, तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्न्नोनती अभियान उमेद टीम व पंचायत समिती जव्हार यांच्या माध्यमातून हे मशीन देण्यात आली.
तसेच त्याला भात कापणीचे मशीन, मळणी यंत्र ,राईस मिल, मिनी ट्रॅॅक्टरही देण्यात आले आहे.

Web Title: Bhatlagavadha machine for saving group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.