भावजयीचा फरार मारेकरी अखेर गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 05:58 AM2017-10-19T05:58:43+5:302017-10-19T05:58:55+5:30
आपल्या भावजयीची दिवसाढवळ््या घरात घुसून हत्या करून फरार झालेल्या आरोपीला नालासोपारा पोलिसांनी मालाड येथून अटक केली. सलमान शेख असे आरोपीचे नाव आहे.
वसई : आपल्या भावजयीची दिवसाढवळ््या घरात घुसून हत्या करून फरार झालेल्या आरोपीला नालासोपारा पोलिसांनी मालाड येथून अटक केली. सलमान शेख असे आरोपीचे नाव आहे.
नालासोपारा पश्चिमेकडील डांगेवाडी येथील नसीमा अपार्टमेंट राहणाºया निखत शेख हिची १६ आॅक्टोबरला दुपारी बाराच्या सुमारास सलमानने तिच्या घरात घुसून तिची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर नालासोपारा येथे राहणारा सलमान फरार झाला होता.
सलमानला शोधण्यासाठी नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, उपनिरीक्षक सुहास कांबळे, हवालदार साईल, गाडेकर, विलास पवार, अश्वीन पाटील, हर्षद चव्हाण यांच्या सहाय्याने बातमीदाराच्या मदतीने सलमानला दुसºयाच दिवशी मालाड येथून अटक केली.
निखतचे चार वर्षांपूर्वी नालासोपारा येथील नदीम शेखसोबत झाले होते. तिला एक तीन वर्षांची मुलगी असून ती गरोदर होती. नदीम ट्रक्सी ड्रायव्हर असून सलमान त्याचा मोठा भाऊ आहे. निखतच्या हत्येची सलमानने कबुली दिली आहे. मात्र, हत्या का केली याचा तपास पोलीस करीत आहेत. निखतचा पती, सासू आणि दीर छळ करीत होते.