मजुरीसाठी ‘भीक माँगो’

By admin | Published: December 23, 2016 02:50 AM2016-12-23T02:50:44+5:302016-12-23T02:50:44+5:30

मोठमोठया निधीची कोरडी आश्वासने देऊन सत्तेवर बसलेल्या भाजपा सरकारकडे रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या

'Bhikh Mango' for wages | मजुरीसाठी ‘भीक माँगो’

मजुरीसाठी ‘भीक माँगो’

Next

पालघर : मोठमोठया निधीची कोरडी आश्वासने देऊन सत्तेवर बसलेल्या भाजपा सरकारकडे रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या गरीब मजुरांची काही हजार रुपयांची मजुरी देण्यासाठीही पैसे नसल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे शासनाच्या तिजोरीत असलेला खडखडाट काहीअंशी कमी करण्यासाठी पालघर मध्ये आज श्रमजीवी संघटनेच्या वतीने भीक मांगो आंदोलन करून ६ हजार ५९१ रु पयांचा जमवलेला निधी शासनाकडे सुपूर्द करण्यात आला.
आज पालघरमध्ये श्रमजीवी संघटनेने एक अभिनव आंदोलन करून सरकारच्या कुचकामी धोरणाचा पार पंचनामाच केला.वाडा पंचायत समिती स्तरावरुन आंबिटघर ग्रामपंचायतीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय योजने अंतर्गत शाळेच्या मैदानाच्या सपाटीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. त्याकामातील मस्टर क्र मांक ४०३२ मध्ये ३१ मजुरांना प्रत्येकी देय रक्कम म्हणून ७६० रु पये असे एकूण १९ हजार, मस्टर क्र मांक ४०३३ मध्ये ६ मजुरांना प्रत्येकी ७६० प्रमाणे एकूण ३ हजार ८०० रु पये तर मस्टर क्र मांक ४०५१ मध्ये ३१ मजुरांना प्रत्येकी ११५२ प्रमाणे ३५ हजार ७१२ रु पये प्रमाणे एकूण रक्कम ६८ मजुरांचे ५८ हजार ५१२ रु पये इतकी रक्कम राज्यशासनाकडून अनेक वेळा मागणी करूनही दिली गेली नाही. मजुरांना देण्यात यावयाची ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत जमा करण्यात आलेली नसल्याचे लेखी उत्तर वाडा पंचायत समिती कडून देण्यात आले असल्याचे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित यांनी सांगितले. अशा अनेक घटना पालघर जिल्ह्यातील गावा गावात आढळून येत असल्याने आदिवासी समाजातील मजुरांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. पुरेसा रोजगार ही स्थानिक पातळीवर निर्माण करू दिला जात नसल्याने नाईलाजाने विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा ई. तालुक्यातील हजारो मजूर आपल्या कच्च्याबच्यांसह स्थलांतरीत झाले आहेत.
रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी बाबत कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी रोहयो सह कातकारींचे रेशनकार्ड, बँकेतील चलन तुटवडा, वनहक्क दावे, घरकुल, आणि नगरपंचायत हद्दीतील मजुरांना रोहयो ची काम मिळत नाहीत या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी रोहयो च्या कामाची मजुरी देण्यासाठी शासन पातळी वरून कोटी ७८ लाख रु पयांची रक्कम आली असून मजुरांना लवकरच त्याचे वाटप होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी संघटनेने जमा केलेला निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणार असल्याचे श्रमजीवी ने सांगितले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, उपजिल्हाधिकारी नवनाथ जरे, जिल्हा माहिती अधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थिती होते. यावेळी श्रमजीवीचे विजय जाधव, सुरेश रेंजड, प्रमोद पवार, उल्हास भानुशाली, गणेश उंबरसाडा, सरिता जाधव, दिनेश पवार, कैलास तुंबडा, रेखा धांगडे, मिलिंद थुले,मनोज काशीद, बाळाराम पडोसा, बजरंग वळवी, सुरेश बरडे, दिलीप लोंढे, निलेश वाघ, विशाल घाटाळ, मनीष भानुशाली, आणि इतर पदाधिकारी सहभागी होते. (प्रतिनिधी)

Web Title: 'Bhikh Mango' for wages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.