Virar Covid hospital Fire: मोठी दुर्घटना! विरारच्या कोविड रुग्णालयात भीषण आग; 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 07:05 AM2021-04-23T07:05:17+5:302021-04-23T07:28:33+5:30
Fire broke out at Virar Covid hospital पालघर जिल्ह्यातील विरारच्या कोविड सेंटरमध्ये ही आग लागली आहे. एसीचा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे.
वसई : दोन दिवसांपूर्वीची नाशिकची ऑक्सिजन टाकी लीक झाल्याने २४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता विरारच्या कोविड हॉस्पिटलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली आहे. हॉस्पिटलला लागलेल्या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. (13 patients have died in the fire at Virar Covid hospital fire broke out)
12 patients have died in the fire at Vasai Covid hospital: Corona Control Room, Vasai Virar Municipal Corporation
— ANI (@ANI) April 23, 2021
पालघर जिल्ह्यातील विरारच्या विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये ही आग लागली. कोविड सेंटरमध्ये ही आग लागली आहे. एसीचा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. या आगीत १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे, असे वसई-विरार महापालिकेच्या कोरोना कंट्रोल रुमकडून सांगण्यात आले आहे. अन्य रुग्णांना इतरत्र हलविण्यात आले आहे.
#UPDATE 13 people have died so far in fire at COVID hospital in Virar, in Vasai Virar municipal limits, Palghar district
— ANI (@ANI) April 23, 2021
(Earlier visuals)#Maharashtrapic.twitter.com/KHTiSqbLMY
विरारच्या तिरुपती नगरमध्ये विजय वल्लभ हॉस्पिटल आहे. पहाटे ३.१५ च्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात आग लागली होती. विरार अग्निशमन दलाचे ०३-फायर वाहनांनी पहाटे ०५:२० वा. सुमारास आग विझवली. एकूण 90 रुग्ण उपचार घेत होते.
रुग्णालयाबाहेर नातेवाईकांचा आक्रोश
रुग्णालयातील अतिदक्षता विभाग मधील 17 पैकी 13 जण दगावले तर अन्य 4 व अन्य रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात येत असल्याचे विजय वल्लभ रुग्णालय प्रशासनाचे डॉक्टर दिलीप शाह यांनी सांगितले. रुग्णालयाबाहेर नातेवाईकांचा आक्रोश सुरु आहे. जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांच्यसाहित आमदार हितेंद्र ठाकूर, आम क्षितिज ठाकूर सहित संपूर्ण पोलीस व पालिका प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहेत. पालकमंत्री नाशिकच्या मालेगावमधून घटनास्थळी पाहणीकरण्यासाठी काही वेळातच येणार आहेत.
Maharashtra | 13 people have died after a fire broke out in the Intensive Care Unit (ICU) around 3am today. 21 patients including those in critical condition have been shifted to another hospital: Dr. Dilip Shah, official, Vijay Vallabh COVID care hospital, Virar pic.twitter.com/0GNUlHlgt4
— ANI (@ANI) April 23, 2021
सर्वप्रथम रुग्णालयातील जे इतर रुग्ण उपचार घेत होते त्यांना इतरत्र हलवणे हे प्रथम कर्तव्य आहे. बाकी चूक कुणाची आहे, कोण जबाबदार या सर्व गोष्टी नंतर, असे आम हितेंद्र ठाकूर यांनी माध्यमांना सांगितले.