चिंबोऱ्या, पावसाळी मुठयांना खवैय्यांकडून मोठी मागणी

By admin | Published: July 6, 2016 02:24 AM2016-07-06T02:24:23+5:302016-07-06T02:24:23+5:30

पावसाळा सुरु झाला की, साऱ्यांनाच वेध लागतात ते रानभाज्यासोबत काळयाभोर चिंंबोऱ्या आणि मुठ्यांचे. खवय्यांसाठी मेजवानी ठरणाऱ्या चिंंबोऱ्या आणि खेकडे (मुठे) सद्यस्थितीत

Big demand from gourmandisers for chimbo | चिंबोऱ्या, पावसाळी मुठयांना खवैय्यांकडून मोठी मागणी

चिंबोऱ्या, पावसाळी मुठयांना खवैय्यांकडून मोठी मागणी

Next

- राहुल वाडेकर, विक्रमगड

पावसाळा सुरु झाला की, साऱ्यांनाच वेध लागतात ते रानभाज्यासोबत काळयाभोर चिंंबोऱ्या आणि मुठ्यांचे. खवय्यांसाठी मेजवानी ठरणाऱ्या चिंंबोऱ्या आणि खेकडे (मुठे) सद्यस्थितीत विक्रमगड बाजारात दिसू लागले आहेत. तालुक्यातील खेड्या-पाड्यातील आदिवासी रात्रभर पावसात फिरुन त्यांना पकडत असतात. मात्र, त्यांना हवा तसा पैसा यातून मिळत नसल्याने आता हा पावसाळ्यातील मेवा विक्रीसाठी शहराकडे वळू लागला आहे.
सध्या समुद्रात मासेमारी बंद असल्याने व पावसाळयात सापडणाऱ्या चिंंबोऱ्या भरलेल्या असल्याने त्यांना अधिक चव असते शहरीभागातून त्यांच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. चिंंबोऱ्या किंवा खेकडे (मुठे) हे उभयचर प्राणी वर्गात येतात. पाणी आणि जमीन हे त्यांच्या वास्तव्याचे ठिकाण आहे.
मांसाहार करणाऱ्यांना मच्छी मटणापेक्षाही पावसाळयात सुरुवातीला मिळणाऱ्या काळया चिंंबोऱ्या किंवा खेकडयांचा (मुठे) झणझणीत रस्सा अधिक रूचकर वाटत असल्याने पावसाळा सुरु झाला की, खवय्ये बाजाराकडे धाव घेतात. फक्त पावसाळयातच चिंंबोऱ्या मिळत असल्याने दोन-तीन महिनेच आदिवासींना यातून रोजगार मिळतो. चिंंबोऱ्या आणि खेकडयांची मागणी वाढत असली तरी आजच्या महागाईत आदिवासींना यातून पुरेसे उत्पन्न मिळत नाही. मात्र शेती आणि पशुपालनासोबत हंगामी व्यवसाय म्हणून आदिवासींच्या उदरनिर्वाहासाठी निसर्गाने देऊ केलेली ही साधनसंपत्ती निश्चितच फायदेशीर ठरत आहे हे मात्र तितकेच खरे आहे.

चिंबोऱ्या, मुठे पकडण्यासाठीही लागते मोठे कौशल्य
सध्या बाजारात या चिंबोऱ्यांची आवक सुरु झाली असून या चिंंबोऱ्या किंवा खेकडे पकडणे हे देखील एक कौशल्यच (कसबच) आहे. आदिवासंीनी हे कसब सहज अवगत केले आहे. रात्री पलिते (मशाल)किंवा गॅसबत्ती घेऊन ते आपल्या मोहीमेवर निघतात.
चिंबोऱ्या पकडण्यासाठी लोखंडी शिगेचा वापर केला जातो. अथक परिश्रम केल्यानंतर मिळालेल्या चिंंबोऱ्या आणि खेकडे (मुठे) व्यवस्थित जुडयात बांधून ते बाजारात किंवा खरेदी करणाऱ्यांच्या घरी जाऊन विक्री करतात. समुद्रातील किंवा खाडीच्या चिंबोऱ्यांपेक्षा या चिंंबोऱ्यांना पावसाळ्यात अधिक मागणी असते.
सहा चिंंबोऱ्यांसाठी १०० ते १५० रुपये व १०० रुपये डझनप्रमाणे खेकडयांची विक्री केली जाते. निसर्गाकडून मिळणारी ही प्राणी संपदा आदिवासींच्या उपजिवीकेला मोठा हातभार लावत आहे. रात्रीचे परिश्रम आणि दिवसभराच्या विक्रीतून ४०० ते ५०० रुपये या आदिवासींच्या पदारात पडतात.

Web Title: Big demand from gourmandisers for chimbo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.