दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक; तीन गुन्ह्यांची उकल, चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2023 08:10 PM2023-08-25T20:10:47+5:302023-08-25T20:10:56+5:30

२० ऑगस्टला गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार आचोळे पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगार वॉच पेट्रोलींग करीता फिरत होतो.

Bike-stealing inn criminal arrested; Three crimes solved, five stolen bikes seized | दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक; तीन गुन्ह्यांची उकल, चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत

दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक; तीन गुन्ह्यांची उकल, चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत

googlenewsNext

मंगेश कराळे

नालासोपारा :- दुचाकी चोरणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात आचोळ्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी आरोपीकडून तीन गुन्ह्यांची उकल करून चोरी केलेल्या पाच दुचाकी हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी शुक्रवारी दिली आहे.

काजूपाड्याच्या अंबावाडी चाळ येथे राहणाऱ्या दिपक जयप्रकाश विश्वकर्मा (२५) या तरुणाची ३० जुलैला आचोळे गाव येथील जिवदानी अपार्टमेंट येथे रात्री पार्किंग केलेली दुचाकी चोरीला गेली होती. आचोळे पोलिसांनी वाहन चोरीचा गुन्हा दाखल केला होता. वसई नालासोपारा परिसरात तसेच आचोळे पोलीस ठाणे हद्दीमध्ये दुचाकी चोरीचे गुन्हे घडत असल्याने व सदरचे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार हे चोरट्याचा शोध घेत होते.

२० ऑगस्टला गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार आचोळे पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगार वॉच पेट्रोलींग करीता फिरत होतो. दरम्यान अलकापुरी बाजार पटांगण, मुख्य रोडवरुन चंदन नाका बाजुकडे एक इसम संशयीत त्याचे ताब्यातील एफझेड दुचाकीवरून जात असताना दिसून आला. त्याला थांबवुन त्याचेकडे नाव पत्ता विचारल्यावर त्याने नाव पवन अशोक मिश्रा ऊर्फ पवन गुरू (२९) असे सांगितले. त्याच्या कब्जात एकुण १२ दुचाकीच्या चाव्या मिळून आल्या.  तसेच ज्या दुचाकीवर फिरत होता त्याबाबत विचारपूस केल्यावर त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्याला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केल्यावर सदरची दुचाकी ही काही दिवसापूर्वी आचोळे येथून चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपीला अटक करून अधिक विचारपूस करत सखोल तपास केल्यावर त्यांचेकडुन १ लाख ९० हजारांच्या ५ दुचाकी हस्तगत करुन आयुक्तालयातील ३ गुन्ह्यांची उकल केली आहे.

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांचे मार्गदर्शनाखाली आचोळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विवेक सोनवणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशपाल सुर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक बुधवंत लोंढे, सुहास म्हात्रे, पोलीस हवालदार दत्तात्रय दाईंगडे, प्रशांत सावदेकर, शंकर शिंदे, निखील चव्हाण, विनायक कचरे, आमोल सांगळे, मोहनदास बंडगर, बाळू आव्हाड, मोहन पाईकराव यांनी केली आहे.

Web Title: Bike-stealing inn criminal arrested; Three crimes solved, five stolen bikes seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.