तिळगाव-कोकणीपाडा रस्ता न करता दिली बिले
By admin | Published: March 16, 2017 02:38 AM2017-03-16T02:38:42+5:302017-03-16T02:38:42+5:30
तालुक्यातील या दुर्गम गावाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाल्याने गरोदर महिला व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे या गावातील नागरिकांनी
वाडा : तालुक्यातील या दुर्गम गावाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाल्याने गरोदर महिला व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे या गावातील नागरिकांनी रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी केली. त्या अनुशंगाने २०१४-१५ मध्ये पंतप्रधान ग्रामसडक विभागाकडून मंजूर होऊन हा रस्ता कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखवून काम न करताच बिले काढण्यात आल्याचा आरोप येथील ग्रामस्थ बाबळ्या गावित यांनी केला असून चौकशीची मागणी केली आहे.
हा रस्ता ७०० मीटरचा असून त्याच्या दुरूस्तीसाठी ७ लाख ८९ हजार रूपये मंजूर झाले होते. त्या चा टेंडर नंबर १०/२०१४-१५ होता. परंतु प्रत्यक्ष या रस्त्याची दुरूस्ती न करता संबंधित शाखा अभियंता विनोद घोलप यांनीच हे काम एका ठेकेदाराने कागदोपत्री केल्याचे दाखवून त्याचे बिल काढण्याचा प्रताप केला असल्याचा त्यांनी आरोप केला आहे.