वीजबिल वाढीवरून वसईत भाजपा आक्रमक; वसई महावितरण कार्यालयासमोर केली होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 06:11 PM2020-11-23T18:11:08+5:302020-11-23T21:15:59+5:30
उत्तम कुमार यांच्या आंदोलनानंतर महावितरण कार्यल्याकडून महावितरण अधिकारी फुलपघारे यांनी आंदोलन ठिकाणी येऊन, ज्यांना अवास्तव वीजबिल आलेले आहे त्यांचे तात्काळ निरसन करण्यात येईल, अशी ग्वाही दिली
आशिष राणे
वसई -वाढीव विजबिलावरून भाजपा महाराष्ट्र प्रदेशकडून आंदोलन जाहीर केल्यानंतर त्याचे पडसाद वसईत सोमवारी जोरदार उमटले. वसई महावितरण कार्यालयासमोर भाजपाने जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने वाढीव विजबिलांची होळी करत राज्यातील महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात "चोर चोर बिजली चोर" अशा अनेक घोषणा देत आपला रोष व्यक्त करत निषेध व्यक्त केला.
जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांनी उपस्थितांना संबोधित करताना, फक्त स्वतःच्या विकासासाठी एकत्रित आलेल्या तीन पक्षांची तिघाडी तय्यार करून अनैसर्गिक पणे उदयास आलेल्या या महाभकास आघाडी कडून जनतेला कोणत्याही अपेक्षा नाहीत. जनतेचा कौल झुगारून ही आघाडी तय्यार झाली आहे, त्यामुळे जनतेशी व त्यांच्या भावनांशी या सरकारला काही देणंघेणं नाही. असे ते म्हणाले.
उत्तम कुमार यांच्या आंदोलनानंतर महावितरण कार्यल्याकडून महावितरण अधिकारी फुलपघारे यांनी आंदोलन ठिकाणी येऊन, ज्यांना अवास्तव वीजबिल आलेले आहे त्यांचे तात्काळ निरसन करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी उत्तम कुमार यांना व उपस्थितांना देण्यात आली. तसेच यावेळी ऍड. साधना धुरी यांनी बोलताना, असंवेदनशील असे हे सरकार आहे. वेळीच या सरकारची उचलबांगडी होणे गरजे आहे. अशी टीका त्यांनी महाआघाडी सरकारवर केली.
यावेळी जिल्हा सचिव अपर्णा पाटील, रमेश पांडे, सुरेश देशमुख, सिद्धेश तावडे, मयांक सेठ, सुधान्शु चौबे, मेथीव कोलासो, महेश सरवणकर, किरण पवार, केतन गांधी, संजय अचीपालिया, रिटा इस्सार, दिनेश मकवाना, इकबाल मुखी, आशिष सुळे, एबीन अब्राहम, एच. आर. सकसेना, ऋषी वोरणी, अभिजीत आचारी, शैली डांग आदी पदाधिकारी व मोठ्याप्रमाणात नागरीक उपस्थित होते.