भाजपा जिल्हाध्यक्ष अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 03:38 AM2017-08-19T03:38:11+5:302017-08-19T03:38:13+5:30
वसई विरार भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी मयत पत्नीच्या नावे वेगवेगळ््या तारखांचे दोन मृत्यु दाखले तयार केले
शशी करपे ।
वसई : वसई विरार भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी मयत पत्नीच्या नावे वेगवेगळ््या तारखांचे दोन मृत्यु दाखले तयार केले. त्यानंतर दुसºया पत्नीला मयत पत्नीच्या जागी उभे करून उपनिबंधक कार्यालयात एक दस्तऐवजाची नोंदणी केली. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार करूनही गुन्हा दाखल न केल्याने आमदार सुनिल तटकरे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडल्याने जिल्हाध्यक्षांच्या अडचणी वाढल्या आहेत.
भाजपाचे वसई विरार शहर जिल्हाध्यक्ष सुभाष साटम यांनी एका गाळ््याची दस्तनोंदणी करण्यासाठी आपली मयत पत्नी सुवर्णा साटम यांच्या जागी दुसरी पत्नी अर्पिता साटम यांना उभे करून उपनिबंधकांकडे दस्तऐवज नोंदणी केली होती. त्यासाठी साटम यांनी मयत पत्नीला दोन वेळा मृत्यु दाखवून वसई विरार महापालिकेकडून दोन वेळा मृत्युची दाखले काढल्याची खळबळजनक तक्रार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांनी पोलिसांकडे केली होती. यात रामभाऊ म्हाळगी सहकारी पतसंस्थेची आर्थिक फसवणुक झाल्याची तक्रारही गुंजाळकर यांनी केली होती.
सुभाष साटम यांची पत्नी सुवर्णा साटम यांचा २८ एप्रिल २००३ रोजी मृत्यु झाला होता. त्यानंतर साटम यांनी डॉक्टरांचे मृत्यु प्रमाणपत्र जोडून महापालिकेतून १४ मे २००३ रोजी मृत्यु दाखला घेतला होता. त्यानंतर साटम यांनी सदर गाळ््याची दस्तनोंदणी २००६ रोजी उपनिबंधक कार्यालयात केली होती. त्यावेळी दुसरी पत्नी अर्पिता साटम यांना मयत पत्नीच्या नावाने उभे करण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे सुभाष साटम यांनी पहिली पत्नी १५ आॅक्टोबर २०११ रोजी मयत झाल्याचे मृत्यु प्रमाणपत्र दुसºया एका डॉक्टरकडून घेऊन वसई विरार महापालिकेच्या कार्यालयातून १८ डिसेंबर २०१२ रोजी दुसरा मृत्यु दाखला घेतला होता.
भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी आपली पहिली पत्नी दोन वेळा मृत्यु दाखवून दोन वेगवेगळे मृत्यु दाखले घेऊन महापालिकेची फसवणुक केल्याने त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी गुंजाळकर यांनी तुळींज पोलीस ठाण्यात केली होती. पण, सहा महिन्यात पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे आमदार सुनील तटकरे यांनी नुकत्याच झालेल्या विधीमंडळ अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली होती. ती शेवटच्या दिवशी दाखल करण्यात आली आहे.
>पोलिसांनी तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करणे आवश्यक
राजकीय दबावाखाली कारवाई न करणाºया पोलिसांनी राज्य सरकारला तक्रार गुंजाळकर जबाव देण्यासाठी हजर न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती कळवली आहे.
याबाबतीत गुंजाळकर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करीत पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.गुंजाळकर यांनी याप्रकरणी महापालिकेची फसवणुक झाल्याने महापालिकेने गुन्हा दाखल करावा अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. बोगस दस्ताऐवज करणाºया बिल्डरांविरोधात महापालिका स्वत: गुन्हा दाखल करते. साटम यांनीही बोगस कागदपत्रे तयार करून महापालिकेची फसवणुक केली आहे.
त्यामुळे महापालिकेने साटम यांच्यासह बोगस मृत्यु प्रमाणपत्र देणाºया डॉक्टरांवरही कारवाई करण्याची मागणी गुंजाळकर यांनी केली
आहे. या प्रकरणी वसइ विरार महानगरपालिका प्रशासन काय कायवाई करते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.