शिवसेनेशी वारंवार पंगा घेणे भाजपला पडले महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 03:19 AM2018-05-16T03:19:40+5:302018-05-16T03:19:40+5:30

गेली साडे तीन वर्षे भाजपाने विशेषत: विष्णू सवरा यांनी शिवसेनेशी निष्कारण वारंवार पंगा घेतला त्याचा परिणाम शिवसेनेने त्यांना व त्यांच्या पक्षाला धडा शिकवण्याची संधी साधण्यात झाला.

The BJP fell sharply to get rid of Shiv Sena | शिवसेनेशी वारंवार पंगा घेणे भाजपला पडले महाग

शिवसेनेशी वारंवार पंगा घेणे भाजपला पडले महाग

Next

नंदकुमार टेणी
पालघर : गेली साडे तीन वर्षे भाजपाने विशेषत: विष्णू सवरा यांनी शिवसेनेशी निष्कारण वारंवार पंगा घेतला त्याचा परिणाम शिवसेनेने त्यांना व त्यांच्या पक्षाला धडा शिकवण्याची संधी साधण्यात झाला. त्यातूनच श्रीनिवास वनगांच्या हायजॅकींगचे नाट्य घडले प्रत्येक छोटया मोठया प्रसंगी सवरा शिवसेनेला हेतूत: डिवचत गेले त्याची ही परिणती होती.
अलीकडेच झालेल्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडणूकीत शिवसेनेला उपाध्यक्षपद द्यायचे ठरले होते, एकदा पद द्यायचे ठरले की ते कुणाला द्यायचे हा निर्णय संबधीत पक्षाचा असतो त्यात कुणीच ढवळाढवळ करीत नाही. परंतु युतीचा हा नियम सवरांनी यावेळी मोडला उपाध्यक्षपद सेनेला द्यायचे ठरल्यावर प्रकाश निकम यांना ते देण्याचे सेनेने ठरवले ऐन मतदानाच्या दिवशी सवरांनी प्रकाश निकम हे मला मंजूर नाहीत दुसरा उमेदवार निवडा नाहीतर हे पद आम्ही सेनेला देणार नाही अशी आडमुठी भूमिका घेतली. त्यामुळे ऐन वेळी यापदी वाडयाच्या निलेश गंधे यांची वर्णी लागली आता निकम यांना विरोध का तर ते २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत सवरांचे प्रमुख विरोधक होते व क्रमांक २ ची मते मिळवून त्यांनी सवरांना घाम फोडला होता.
असाच प्रकार भाजपाने अनेक वेळा केला . या जिल्हयात सवरा म्हणजेच भाजप असल्याने या प्रकारांचे कर्ते करविते सवरा हेच होते. पालघर जिल्हा परिषदेत शिवसेना व भाजप युती आहे. त्या जोरावरच भाजप सत्ताधारी बनली त्यामुळे काही समित्यांची पदे शिवसेनेला देण्याचे ठरले होते परंतु जिल्हा परिषदेचे बांधकाम समिती सभापतीपद देण्याचे ठरवूनही ते बहुजन विकास आघाडीला देण्यात आले. तसेच समाजकल्याण समिती सभापतीपद भाजपला देण्याचे मान्य करूनही ऐन वेळी ते भाजपाने स्वताकडे घेतले. युती असल्यामुळे अडीच वर्षे जि.प. चे अध्यक्षपद सेनेला द्यावे ही सेनेची मागणीही भाजपाने झिडकारून लावली. डहाणू पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती पद भाजपाने सेनेऐवजी बविआला मिळवून देणे श्रेयस्कर मानले. जिल्हा नियोजनच्या निवडणूकीत असेच झाले भाजप-सेना युतीकडे ९ मते होती असे असतांना सेनेच्या प्रकाश निकम यांना पाडून हे महत्वाचे पद राष्टÑवादीच्या सदस्याला मिळवून देण्यात भाजपाने धन्यता मानली. कोणत्याही समितीवर भाजपने एकाही सेनाकार्यकर्त्याची नियुक्ती होऊ दिली नाही. याचा बदला शिवसेनेने मोखाडा, जव्हार, या नगरपंचायतीत सत्ता मिळवून घेतला. पालघर नगर परिषदेतही भाजपाला धूळ चारली विक्रमगडमध्ये निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखाली विकास आघाडीला छुप्पा पाठिंबा देऊन सत्तेवर आणली. वाडा नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत सवरांची कन्या निशा हिचा दारूण पराभव केला तसेच नगरपंचायतीची सत्ताही काबीज केली. शिवसेना अशी एका पाठोपाठ एक पराभवाचे जोरदार रट्टे देत होती तरी सवरा आणि भाजप यांना शहाणपण येत नव्हते. तर सेनेला चेव चढत होता त्यातूनच ठाणे जि.प. मध्येही सेनेची सत्ता आली. आता याच विजय मालिकेची पुनरावृत्ती घडविण्याचा चंग शिवसेनेने बांधला आहे.
>महाजन नीतीचा विसर
जर सवरा यांनी प्रमोद महाजनांची नीती अनुसरून जिल्हयातील शिवसेनेला सांभाळले असते तर सगळेच चित्र वेगळे दिसले असते परंतु हम करे सो कायदा या मुजोरीमुळे भाजपा आणि सवरा या सगळयांचेच नुकसान झाले आहे.

Web Title: The BJP fell sharply to get rid of Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.