छोट्या उद्योगांना संपविण्याचे काम भाजप सरकार करतेय; नाना पटोलेंची टीका

By नितीन पंडित | Published: September 30, 2023 09:45 PM2023-09-30T21:45:11+5:302023-09-30T21:46:00+5:30

येत्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी लोकसभेबरोबरच भिवंडी पूर्व व पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या दोन्ही जागा काँग्रेस जिंकेल असा विश्वास यावेळी पटोले यांनी व्यक्त केला.

BJP government is working to kill small industries; Criticism of nana Patole | छोट्या उद्योगांना संपविण्याचे काम भाजप सरकार करतेय; नाना पटोलेंची टीका

छोट्या उद्योगांना संपविण्याचे काम भाजप सरकार करतेय; नाना पटोलेंची टीका

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : देशातील छोटे उद्योग डबघाईला आले असून शेतकरी,कामगार,युवकांचे असंख्ये प्रश्न आजही प्रलंबित असून राज्यात बेरोजगारीची समस्या गंभीर बनली असतांनाच मागील दहा वर्षांच्या काळात छोट्या उद्योगांना संपविण्याचे काम भाजप सरकारने केले आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.भिवंडीत ६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बुनकर संमेलनाच्या आयोजनाचा आढावा घेण्यासाठी पटोले शनिवारी भिवंडीत आले होते. यावेळी काँग्रेस मध्यवर्ती शहर कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

  भिवंडीत आयोजित केलेल्या काँग्रेसच्या या बुनकर मेळाव्याला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित राहणार असल्याची माहिती पटोले यांनी दिली. त्यानंतर पटोले यांनी सभेचे आयोजन होणाऱ्या टावरे स्टेडियमची पाहणी केली.

त्यानंतर काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या घरी गणपतीचे दर्शन घेतले. येत्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी लोकसभेबरोबरच भिवंडी पूर्व व पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या दोन्ही जागा काँग्रेस जिंकेल असा विश्वास यावेळी पटोले यांनी व्यक्त केला. राज्यातील शिंदे सरकारने दीड वर्षांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार केला नसून राज्यातील जवळपास १७ मंत्री पदे रिक्त असल्याने एका एका मंत्राकडेच पाच ते सहा खाती असल्याने सामान्य नागरिकांचे मूळ प्रश्न सुटत नसल्याची टीकाही यावेळी पटोले यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ नख्यांबाबत विचारले असता, भाजप सरकार जुमले करण्यात एक्सपर्ट असून ही वाघ नखे नक्की खरी की खोटी याचे निष्कर्ष कोण काढणार असा सवाल पटोले यांनी उपस्थित करत राज्यात कंत्राटी भरती करून युवकांच्या जीवाशी खेळ सुरू केला असून राज्यात कंत्राट भरती नको उलट सरकारी नोकर भरती करणे गरजेचे असून युवकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार तुम्हाला नाही असा इशारा देखील पटोले यांनी यावेळी शिंदे फडणवीस पवार सरकारला दिला.

Web Title: BJP government is working to kill small industries; Criticism of nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.