भाजपाचा विरारचा नेता तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 23:09 IST2019-04-24T23:09:15+5:302019-04-24T23:09:33+5:30
भारतीय जनता पक्षाचे वसई विरार अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष जावेद अन्सारी याच्यासह सात जणांना प्रांताधिकाऱ्यांनी पालघर जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे

भाजपाचा विरारचा नेता तडीपार
नालासोपारा : भारतीय जनता पक्षाचे वसई विरार अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष जावेद अन्सारी याच्यासह सात जणांना प्रांताधिकाऱ्यांनी पालघर जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे तर खंडणी प्रकरणातील आरोपी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नेता व माजी जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर, बविआच्या नगरसेविका जया पेंढारी यांचा मुलगा अमित याच्यासह २६ जणांचा समावेश करण्यात आला आहे. या दोघांविरुध्द तुळींज, वालीव पोलीस ठाण्यात १५ व ६ गंभीर गुन्हे दाखल असल्याने निवडणुकीच्या काळात मतदानाच्या दिवसा अगोदर १४ दिवस आणि मतमोजणीच्या तीन दिवशी मनाई आदेश प्रांतानी काढला असल्याचे तुळींज वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॅनियल बेन यांनी सांगितले. तर वसईतील बहुचर्चित खंडणी प्रकरणातील आरोपी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा माजी वसई विरार जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर याच्यासह २६ जणांवर मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.