भाजपात ‘जुने विरुद्ध नवे’ वाद सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 01:14 AM2019-01-24T01:14:24+5:302019-01-24T01:16:16+5:30
भाजपच्या पालघर शहर अध्यक्ष तेजराज हजारी यांना हटवून त्यांच्या जागी अॅड. जयेश आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आल्याने ‘जुने विरुद्ध नवे’ आशा वादाला तोंड फुटली आहे.
- हितेन नाईक
पालघर : भाजपच्या पालघर शहर अध्यक्ष तेजराज हजारी यांना हटवून त्यांच्या जागी अॅड. जयेश आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आल्याने ‘जुने विरुद्ध नवे’ आशा वादाला तोंड फुटली आहे. नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावरच भाजप मध्ये दोन गट निर्माण झाल्याने एका गटाने निवडणुका दरम्यान काम करणार नसल्याचे पत्र वरिष्ठांना पाठवले आहे.
पालघर शहरात भाजपाची तशी विशेष ताकद नसल्याने कित्येक वर्षांपासून भाजपचा एकही नगरसेवक निवडून येऊ शकलेला नाही. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात भाजपची एकहाती सत्ता असताना पालघर नगर परिषदेवरील सत्ता बदल करण्याची चांगली संधी भाजप कडे आहे. त्यातच अनेक पक्षाचे नगरसेवक भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या वर्चस्वाला शह देण्याची चांगली संधी भाजप सह विरोधकांकडे आहे. त्यामुळे भाजपसह अन्य विरोधी पक्षांची आघाडीचे संकेत मिळत असल्याच्या पाशर््वभूमीवर शहरात भाजपकडून जनमानसावर पकड असलेल्या व्यक्तीचा शोध लोकसभा पोटनिवडणुकी पासून सुरु होता. त्यातून जयेश आव्हाड यांची निवड करण्यात आली.
नगर परिषदेची निवडणूक तोंडावर असून पदाधिकारी बदलाचा परिणाम होऊन काही कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता भाजपच्या पदाधिकाऱ्या कडून व्यक्त केली जात आहे. शहर भाजप अध्यक्ष हजारी यांच्या विरोधात तक्र ारी नसताना त्यांना शहर अध्यक्ष पदा वरून दूर करण्याचे कारण काय?असा प्रश्न भाजपच्या कार्यर्त्यांनी उपस्थित केला असून आम्ही नगरपालिका निवडणुकीचे काम करणार नसल्याचे कळविले आहे. परंतु तेज हजारी यांना हटविण्यात आले नसून त्यांना जिल्ह्याचे चिटणीस पद हे महत्वपूर्ण पद देण्यात आल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार पास्कल धनारे यांनी पत्रकारांना सांगितले.
>माझी चिटणीस पदी निवड झाल्याचे कुठलेही पत्र मला मिळालेले नाही. अजूनही पालघर अध्यक्षपदाचा पदभार माझ्याकडेच आहे.मला पदावरून काढण्यात आल्यास त्याची कारणे मी प्रदेश कार्यालयात विचारणार.
- तेजराज हजारी,
माजी शहर अध्यक्ष