भाजपाने घेतला स्वकार्याचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 03:39 AM2017-11-06T03:39:04+5:302017-11-06T03:39:17+5:30
भाजपा सरकारला सत्तेवर येवून तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शेतकºयांबाबत अनेक चांगले निर्णय घेतले असून, शेतकरी बळीराजा समृद्ध होणार असल्याचे
जव्हार: भाजपा सरकारला सत्तेवर येवून तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शेतकºयांबाबत अनेक चांगले निर्णय घेतले असून, शेतकरी बळीराजा समृद्ध होणार असल्याचे भाजपा प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
जव्हार, मोखाडा, विक्र मगड या तीन तालुक्यातील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी शेतकºयांचे अनेक प्रश्न उपस्थित केले. यामध्ये ग्रामीण भागातील शेतकºयांना कर्ज माफीचा लाभ मिळाला नाही. एकही शेतकरी कर्ज माफीपासून वंचित राहणार नाही. पत्रकारांनी यांनी कृषी मधून मिळणारे साहित्य आता शेतकरी खरेदी करा व बिल जोडून नंतर ५० टक्के सबिसडी घ्या तशेच विदर्भ ,मराठवाडा इकडे शेततळी आणि आपलं कडील शेततळे अनुदानात फरक कसा? मात्र याबाबत मला माहित नसून मंत्रयात माहिती घेऊन सांगतो असे अवधूत वाघ यांनी यावेळी बोलतांना सांगतीले.
राज्य सरकारचे शेतकरी धोरण व योजनांची माहिती सामान्य जनते पर्यंत पोह्चवावी यासाठी जव्हार येथील शासकीय विश्राम गृहात पत्रकार परिषद घेण्यात आली, यावेळी भाजपा प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, खासदार चिंतामण वनगा, पालघर जिल्हा अध्यक्ष व आमदार पास्कल धनारे, पालघर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पुंडलिक भानुशाली उपस्थित होते.
भाजपा सरकार २०१४ ला राज्यात आणि केंद्रात सत्तेवर आले आहे. त्यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार असतांना या सरकारने अनेक प्रकल्प अपूर्ण ठेवले आहेत. शासकीय योजनेतील विविध क्षेत्रातील कामे न करता भ्रष्टाचार झाल्याचे अनेक प्रकार घडले होते. तसेच शेतकºयांना कर्जमाफी न करता पैसे बँकांना दिले होते. सहकार क्षेत्रात मक्तेदारी करून शेतकºयांना वाºयावर सोडले होते. तसेच काँग्रेसने राष्टÑवादीने त्यांच्या काळात तिजोरी रिकामी केली होती. परंतु फडणवीस सरकार आल्यापासून नियोजन करून चांगले कामे करायला सुरवात केली असल्याचे भाजपा प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ यांनी सांगितले.