वाढीव वीज बिल व दुध दरवाढी विरोधात भाजपाचे महाआघाडी सरकार विरोधात आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 07:32 PM2020-08-02T19:32:47+5:302020-08-02T19:40:13+5:30
कोरोना महामारीच्या काळात लोकांकडे मूलभूत गरजा पुरवण्यासाठी पैसे नसताना राज्य सरकारकडून दिलेली वाढीव वीजबिल देयके याच्या विरोधात देखील वसई-विरार जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
वसई - भाजपा वसई-विरार जिल्ह्यातर्फे वाढीव वीज बिल व दुध दरवाढी विरोधात वसई पारनाका येथे उत्स्फूर्त आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने शनिवारी राज्यभरात आंदोलन करण्यात आले त्याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन वसईत देखील पार पडले. दूध उत्पादकांना लिटर मागे 10 रूपये तसेच दूध भुकटीला 50 रुपये सरसकट अनुदान मिळावे,याखेरीज राज्यात महावितरण कोरोना महामारीच्या काळात लोकांकडे मूलभूत गरजा पुरवण्यासाठी पैसे नसताना राज्य सरकारकडून दिलेली वाढीव वीजबिल देयके याच्या विरोधात देखील वसई-विरार जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान जिल्हा महासचिव राजू म्हात्रे, जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्याम पाटकर यांनी उपस्थितांना संबोधित केले.
जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांनी वसई-विरारमध्ये राहणारे बहुतांश नागरिक हे मुंबईला कामावर असल्यामुळे मागील 4 महिन्यांनापासून अनेकांच्या हाताला काम नसल्याचं म्हटलं आहे. तर हातावर पोट असलेल्या कामगारांची अवस्था सुद्धा बिकट आहे. अशा वेळी वाढीव वीज बिल देऊन महाआघाडी नव्हे तर तिघाडी सरकारने वसई-विरारच्या जनतेवर अक्षरशः रस्त्यावर भीक मागण्याची वेळ आणली असल्याचं देखील म्हटलं.
CoronaVirus News : मेकॅनिकल इंजिनिअर मित्रांची कमाल, कोरोनाच्या संकटात भन्नाट यंत्र केलं विकसितhttps://t.co/jPSEiaGrld#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia#coronainamaharashtra
— Lokmat (@MiLOKMAT) August 2, 2020
कोरोना या संकटग्रस्त परिस्थितीत लॉक-अनलॉकचा घोळ सुरू असताना आज नागरिक महावितरण कार्यालयाच्या बाहेर लांबच रांगा लावून उभे आहेत हे खूप क्लेशदायक आहे असंही ते म्हणाले. या आंदोलन प्रसंगी संघटन महासचिव महेंद्र पाटील तसेच जिल्ह्याचे महासचिव उत्तम कुमार यांच्यासमवेत अन्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
CoronaVirus News : उपचारासाठी रुग्णालयात दाखलhttps://t.co/dvIYr1zFHx#AmitShah#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) August 2, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना कोरोनाची लागण
CoronaVirus News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह
टिक टाॅकची 'टिकटिक' किती देशांत?; जाणून घ्या चायनीज अॅपबद्दल बरंच काही...
Video - ...म्हणून गर्भवतीला टोपलीत बसवून नदी पार करत पोहचवलं रुग्णालयात
"राम मंदिरासाठी पंतप्रधान मोदींचं कोणतंही योगदान नाही तर..." भाजपा खासदाराचा घरचा आहेर
धक्कादायक! पंजाबमध्ये विषारी दारूने घेतला 86 जणांचा बळी; 25 जणांना अटक