ब्लॅकमेल करणाऱ्या मित्राचा खून
By admin | Published: January 30, 2016 02:18 AM2016-01-30T02:18:54+5:302016-01-30T02:18:54+5:30
मुंबई-अहमदाबाद हाय वेवर एका तरुणाच्या खुनाचा छडा वालीव पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत लावून आरोपीला अटक केली.
वसई : मुंबई-अहमदाबाद हाय वेवर एका तरुणाच्या खुनाचा छडा वालीव पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत लावून आरोपीला अटक केली.
वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन दिवसांपूर्वी गळा चिरलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. मृताच्या खिशात मुंबई सेंट्रल ते नालासोपारा दरम्यानचे रेल्वे तिकीट होते. त्यावरून मुंबई सेंट्रल सीसीटीव्हीच्या फुटेजवरून माहिती घेऊन अटक केली.
जावेद शेख असे मारेकऱ्याचे नाव असून त्यानेच बबलू शेखचा खून केल्याची कबुली दिली आहे. जावेदला बबलूकडून मालिश करून घेण्याची सवय होती. पण, एका धार्मिक कार्यक्रमावरून आल्यानंतर जावेदने मालिश करायचे बंद केले होते. त्यामुळे बबलू चिडला होता. मालिश करून घ्यावे, यासाठी बबलू जावेदला ब्लॅकमेल करीत होता. त्यामुळे संतापलेल्या जावेदने बबलूचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.
तीन दिवसांपूर्वी रात्री जावेदने बबलूला दारू पाजली. त्याची शुद्ध हरपल्यानंतर त्याने बबलूचा गळा चिरून त्याची हत्या केली. नंतर, मृतदेह मुंबई-अहमदाबाद हाय वेवर निर्जन स्थळी टाकून दिला होता.