डहाणू समुद्रकिनारी ब्लूबटन जेलीफिश; समुद्रीस्नानाच्या मजेवर फेरले पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 12:24 AM2019-05-16T00:24:39+5:302019-05-16T00:24:49+5:30
तालुक्यातील किनारपट्टीवर पोहताना पर्यटकांना जेलिफिशचे दर्शन झाले. याबाबत त्यांनी स्थानिकांच्या मदतीने त्याविषयी जाणून घेतल्यानंतर, सुटका करून घेण्याकरिता तत्काळ किनारा गाठला.
बोर्डी : तालुक्यातील किनारपट्टीवर पोहताना पर्यटकांना जेलिफिशचे दर्शन झाले. याबाबत त्यांनी स्थानिकांच्या मदतीने त्याविषयी जाणून घेतल्यानंतर, सुटका करून घेण्याकरिता तत्काळ किनारा गाठला.
जेलिफिशचा शरीराला स्पर्श झाल्यास त्यामुळे त्वचेला छोटे लालरंगाचे पूरळ येऊन त्या भागाची जळजळ होते. हा त्रास सहन करण्याच्या पलीकडे असतो. मागील दोन दिवसांपासून पारनाका, नरपड, चिखले किनारी ब्लू बटन जेलीफिशचा वावर आढळल्याने पर्यटकामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. उन्हाच्या झळा तीव्र झाल्यानंतर डहाणू हे पर्यटनस्थळ गाठून समुद्रात लाटांशी खेळण्याचा आनंद उपभोगण्यास प्राधान्य देतात. मात्र ऐन हंगामात हा वावर वाढला असून त्याची धास्ती पर्यटकांनी घेतल्याने त्यांच्या जलक्र ीडेच्या आनंदावर विर्जन पडले आहे.
नरपड येथील किनाऱ्यावर काही स्थानिकांना याबाबतची माहिती मिळाली. त्यांनी लागलीच संपर्क साधून याबाबत विचारणा केली. ते ब्लूबटन जेलीफिश असून विषारी असल्याची माहिती वाईल्डलाईफ कन्झर्वेशन अँड एनिमल वेल्फेअर असोसिएशन या प्राणीमित्र संस्थेचे रेमंड डिसोझा यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी असून ही मुलं सायंकाळी खेळण्याकरिता समुद्रावर येतात. व्यायामाला येणाºया नागरिकांची संख्याही अधिक असते.