डहाणूत मोठी दुर्घटना, 40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बोट समुद्रात उलटली; बचावकार्य सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2018 01:10 PM2018-01-13T13:10:23+5:302018-01-13T14:30:25+5:30
डहाणू येथे समुद्रात बोट उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. बोटमध्ये एकूण 40 विद्यार्थी होते. सात विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात स्थानिक मच्छीमारांना यश आलं आहे.
पालघर - डहाणू येथे समुद्रात बोट उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. बोटमध्ये एकूण 40 विद्यार्थी होते. 32 विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश मिळालं असून सात विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. हे सर्व विद्यार्थी के एल पोंडा हायस्कूलचे असल्याची माहिती मिळाली आहे. सर्वजण 11 वी आणि 12 वीचे विद्यार्थी होते. महेश अंबिरे हा बोट मालक विद्यार्थ्यांना घेऊन समुद्रात गेला होता. पिकनिकसाठी हे विद्यार्थी समुद्रात गेले असताना बोट उलटून दुर्घटना घडल्याचं कळत आहे. प्रशासनासह स्थानिकांचे शोधकार्य सुरू आहे. बचावकार्यासाठी मच्छिमारांच्या बोटीदेखील रवाना झाल्या आहेत.
पालघर जिल्ह्यातील के. एल. पोंडा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची सहल आयोजिक करण्यात आली होती. यावेळी 40 विद्यार्थ्यांना घेऊन एक बोट डहाणूच्या समुद्रात गेली होती. मात्र अचानक बोट उलटून विद्यार्थी पाण्यात पडले. यावेळी समुद्रात असणा-या बोटींनी विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या दिशेने धाव घेतली. 2 नॉटिकल अंतरावर ही बोट बुडल्याची माहिती आहे. नेमकी बोट कशामुळे उलटली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सध्या सात विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
#Maharashtra: Boat with 40 school children on board capsizes 2 nautical miles from the sea shore in Dahanu. Rescue operations underway. pic.twitter.com/d38CEm1nex
— ANI (@ANI) January 13, 2018