दोन मुलांचे मृतदेह किनाऱ्यावरच पुरले, आपत्ती व्यवस्थापनाकडे कर्मचारी नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 05:47 AM2018-06-20T05:47:25+5:302018-06-20T05:47:25+5:30
तीन दिवसांपूर्वी नालासोपारा येथून केळवेला फिरायला आलेल्या सातपैकी चार मुलांचा बुडून मृत्यू झाला होता. दीपक चलवादी, दीपेश पेडणेकर, श्रीतेज नाईक, तुषार चिपटे अशी त्यांची नावे होती.
पालघर : तीन दिवसांपूर्वी नालासोपारा येथून केळवेला फिरायला आलेल्या सातपैकी चार मुलांचा बुडून मृत्यू झाला होता. दीपक चलवादी, दीपेश पेडणेकर, श्रीतेज नाईक, तुषार चिपटे अशी त्यांची नावे होती. त्यातील दीपक आणि तुषारचा शोध सोमवारी लागला होता. मंगळवारी दुपारी श्रीतेजचा मृतदेह वडराईला, तर दीपेशचा मृतदेह संध्याकाळी दादरा पाड्याच्या किनाºयावर अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. त्या मुलांचा शोध वेळीच न लागल्याने, त्यांच्या कुटुंबीयांना किनाºयावरच दोघांची प्रेते पुरावी लागली.
केळवे पोलीस स्थानिकांच्या मदतीने दिवसरात्र त्यांचा घेत होते. मात्र, अपुºया व्यवस्थेमुळे त्यांचा शोध घेण्यात अपयश आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग आहे, तरी वसई-विरारच्या अग्निशामक दलाचे दोन जवान फक्त हातात बॅटरी घेऊन मुलांचा शोध घेत होते. या व्यतिरिक्त या विभागाने कुठलीही यंत्रणा उभी केलेली नव्हती. माझ्याकडे स्टाफच नसल्याने मी काय करू, असे आपत्ती विभागाचे प्रमुख कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
घटनेच्या दिवशी तहसीलदार महेश सागर यांच्या भेटी व्यतिरिक्त एकही अधिकारी, लोकप्रतिनिधी घटनास्थळी फिरकलेला नसल्याने, स्थानिकांमधून संतप्त नाराजी व्यक्त केली जात आहे. सहा.पो.नी.काळे हे सागर गोवारी, मंगेश वळवी, राजू मेहेर, सुरेश पडवळे, जगदीश पडवळे, ज्ञानेश्वर सुतार, संगम गोवारी, राजेश मोरे आदी स्थानिक मच्छीमारांच्या टीमच्या सहकार्याने शोध घेत होते. कोस्टगार्ड दमणकडून चेतक हेलिकॉप्टर आणि त्यांची बोट बुडालेल्या तरुणांचा शोध घेत असल्याची माहिती कोस्ट गार्डचे अधिकारी देत असले, तरी घटनेपासून सोमवारपर्यंत असे कुठलेही हेलीकॉप्टर अथवा बोट केळवे किनारपट्टीजवळ कुठेही दिसली नसल्याचे स्थानिकांनी ‘लोकमत’ला सांगितले.