उधवा येथील प्रार्थनास्थळाच्या बोगस एन.ए. आॅर्डरचे प्रकरण भिजत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:21 AM2019-05-20T00:21:20+5:302019-05-20T00:21:22+5:30
बीडीओंच्या आदेशाकडे दुर्लक्ष : जिल्हाधिकाऱ्यांचा बोगस सही शिक्का
सुरेश काटे
तलासरी : तालुक्यातील उधवा येथे बोगस बीन शेती दाखला (एन. ऐ. आॅर्डर) तयार करून प्रार्थनास्थळाचे बांधकाम करण्यात आले. या बाबत तक्रार दाखल होताच तलासरी पोलिसांनी चौकशी करून ती एन ऐ आॅर्डर बनावट असल्याचे उघड केली. त्यानंतर उधवा ग्रामपंचतीचे ग्रामविस्तार अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतीला बनावट आॅर्डर सादर करून परवानग्या घेतलेल्यां विरु द्ध तक्र ार दाखल करण्याचे पत्र देऊनही गेल्या तीन महिन्या पासून ग्रामविस्तार अधिकारी तक्र ार दाखल करण्यास चालढकल करीत असल्याची स्थिती आहे.
उधवा येथे बोगस एन ऐ आॅर्डर बनवून वादग्रस्त बांधकाम करण्यात आले असून ही आॅर्डर बनविताना पालघर जिल्हाधिकारी यांच्या बनावट सही शिक्क्याचा वापर करण्यात आला होता. या बनावट आॅर्डरद्वारे अनेक परवानग्या घेण्यात आल्या. हे उघड होऊनही जिल्हाधिरी डॉ. नारनवरे यांनी कोणतीही कारवाई केली नाही.
बोगस दाखले देणाºया साखळी विरोधात कारवाई करण्या ऐवजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून फक्त अशी कोणतीही आॅर्डर दिली नसल्याचे पोलिसांना कळविण्यात आले. पण, अशा बनावट आॅर्डर बनवून केलेल्या बांधकाम बाबत कारवाई केली नाही. तलासरीत अनेक बांधकामे इमारती आशा संशयास्पद आहेत पण याची दखल ना तलासरी नगर पंचायत घेत, ना तलासरी महसूल विभाग या बाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. तक्रार दाखल करण्यास ग्रामपंचायत पुढे येत नसल्याने तलासरी पोलिसांना तांत्रिक कारण देऊन हात वर केले आहेत. पोलिसांनी ग्रामविस्तार अधिकाºयांना ‘सक्षम अधिकाºयांनी’ तक्र ार दाखल करण्यास सांगितले पण गेल्या तीन महिन्या पासून उधवा ग्रामपंचतीचे ग्रामविस्तार अधिकारी गणपत गवळी याना सक्षम अधिकारी कोण याचा बोध झालेला नाही व त्यांनी वरिष्ठांकडून मार्गदर्शन ही घेतलेले नाही. या प्रकरणात अनेकांची भूमिका संशयास्पद आहे.
१५ लाखांचे लाच प्रकरण : उधवा ग्रामपंचायतीत घडलेली बाब तलासरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राहुल म्हात्रे यांच्या निदर्शनात आणून देऊनही त्यांनी याची माहिती घेतो असे मोघम उत्तर दिले पण बोगस एन ऐ सारखी गंभीर बाब गंभीरतेने घेतली नाही. तसेच, या अगोदर बनावट एन ऐ आॅर्डर ची तक्र ार दाखल होऊ नये व अटक टाळण्यासाठी पंधरा लाखाची लाच मागितली बाबत लाच लुचपत विभागाने सहाय्यक पोलीस निरीक्षक नरोटे यांच्या विरु द्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्र ार दाखल करून कारवाई होत नाही. त्यामुळे बनावट आॅर्डर बनविणाºया टोळ्याा मोकाट आहेत.
-बजरंग शाह, तक्र ारदार
सक्षम अधिकारी बाबत मार्गदर्शन गट विकास अधिकाºयाकडून मागावीत आहे. - गणपत गवळी, ग्रामविस्तार अधिकारी (उधवा)
ग्रामपंचायतीकडून या बाबतची माहिती घेऊन कारवाई करतो.
- राहुल म्हात्रे, गटविकास अधिकारी तलासरी
पंचायत समिती तक्र ार दाखल करण्याचे पत्र देऊनही ग्रामविस्तार अधिकारी तक्र ार दाखल करण्यास पुढे येत नाहीत त्यामुळे कारवाई करण्यास अडथळा येत आहे, याबाबत वरिष्ठ कार्यालयाला पत्र देण्यात येणार आहे. - अजय वसावे, पोलीस निरीक्षक, तलासरी पोलीस स्टेशन