वेहेळपाड्यात आजपासून बोहाडा

By admin | Published: March 16, 2017 02:41 AM2017-03-16T02:41:25+5:302017-03-16T02:41:25+5:30

विक्रमगड तालुक्यातील हाकेच्या अंतरावर असलेल्या वेहेळपाडा (विठ्ठलनगर) येथे आदिवासींच्या अनेक बोली भाषांतील बोहाडा म्हणजेच परंपरागत जगदंबा यात्रोत्सव

Bohada from Wehelapad | वेहेळपाड्यात आजपासून बोहाडा

वेहेळपाड्यात आजपासून बोहाडा

Next

राहुल वाडेकर, विक्रमगड
विक्रमगड तालुक्यातील हाकेच्या अंतरावर असलेल्या वेहेळपाडा (विठ्ठलनगर) येथे आदिवासींच्या अनेक बोली भाषांतील बोहाडा म्हणजेच परंपरागत जगदंबा यात्रोत्सव बुधवारी त्याचा शुभारंभ झाला असून सांगता १७ मार्चला होणार आहे.
आदिवासींकडे पारंपारिक नृत्यकला व अनेक बोलीभाषाही आहेत़ त्याचा अविष्कार घडविणारा हा बोहाडा पाहण्यासाठी तालुक्यातील भाविक उत्साहाने येतात. यंदा हा बोहाडा पाहाण्यासाठी सुमारे १० ते १५ हजाराहून अधिक आदिवासी एकत्र येणार असल्याची माहिती पोलिस पाटील वारंगडे यांनी दिली़
गेल्या ४९ वर्षापासून दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी वेहेलपाडा हा उत्सव साजरा केला जातो़ या यात्रोत्सवात आयोतीत केल्याप्रमाणे १५ मार्च रोजी पहिली थाप १६ मार्च रोजी लहान बोहाडा (दुसरी थाप) साजरी करण्यांत येते़ तर १७ मार्च रोजी मोठा बोहाडा असा तीन दिवस रात्री ८ पासून सकाळी ८ पर्यत जगदंबा यात्रोत्सव मोठया भक्तिभावाने साजरा करण्यांत येणार आहे़
या बोहाडा याÞत्रोत्सवात रामायण, महाभारत आदी पौराणिक ग्रंथातील देव-देवतांची निवड करुन आदिवासी बांधव घरच्या घरी लाकूड, चिकणमाती या वस्तूंपासून त्यांचे आकर्षक मुखवटे तयार करतात़ ते धारण करणारे भाविक त्यानुसार वेषभूषा करतात. नंतर त्यांची मशालींच्या उजेडात मिरवणूक काढण्यात येते यावेळी पारंपारिक वाद्यांचा गजर केला जातो. रात्री ८ ते सकाळी ८ या काळात हा सोहळा सुरु असतो. प्रारंभी गजाननाला वंदन करुन त्यांचे सोंग (मुखवटा)नाचवला जातो त्यानंतर सरस्वती विष्णू आणि पुराणातील देवदेवतांना आवाहन केले जाते. त्यांचे तसेच देवदेवतांच्या युध्दांचे प्रसंग सोंगे सादर करण्यातच पहाट होते़ त्यानंतर गावातील मूळ ग्रामदेवता जगदंबा मातेची विधीवत पूजा करुन मातेचे व महिषासूराचे सोंग यांच्यात युद्ध होते़ व मातेचा विजय होतो. गावात रोगराई, संकटे येऊ नयेत म्हणूनच आदिवासी हा बोहाडा म्हणजेच जगदंबा यात्रोत्सव साजरा करतात़ ग्रामदेवी नवसाला पावते अशी येथील आदिवासी लोकांची श्रध्दा असून यावेळी केलेले नवस फेडण्यासाठी व नविन नवस बोलण्यासाठी भक्त गर्दी करतात़ या यात्रोत्सवात इतरही धर्म, जातीचे बांधव यात्रोत्सवाचा आनंद लुटतात़

Web Title: Bohada from Wehelapad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.