बोईसरला ५५१ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 01:13 AM2019-05-30T01:13:28+5:302019-05-30T01:13:39+5:30
बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेअंतर्गत आदिवासी समाजातील गरीब व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय ५५१ जोडप्यांचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या धूम धडाक्यात बोईसरला संपन्न झाला.
- पंकज राऊत
बोईसर : आधार प्रतिष्ठान, शिवसेना पालघर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेअंतर्गत आदिवासी समाजातील गरीब व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय ५५१ जोडप्यांचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या धूम धडाक्यात बोईसरला संपन्न झाला.
इराणी वाडी ग्राऊंडवर आयोजिलेल्या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) व आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, पालघर जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख आणि आमदार रविंद्र फाटक, पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित, आधार प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष-सचिव जगदिश धोडी, पालघर जिल्ह्याचे शिवसेनाप्रमुख वसंत चव्हाण, पालघर जिल्ह्याचे शिवसेना समन्वय प्रभाकर राऊळ, पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश गंधे, पालघर जिल्ह्याच्या शिवसेना महिला संपर्क संघटक दीपा पाटील, पालघर जिल्ह्याचे शिवसेना युवा अधिकारी राकेश पाटील, शिवसेना पालघर विधानसभा संघटक वैभव संखे, आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेन्द्र सिंग, पालघर तालुका प्रमुख (पालघर व डहाणू विधानसभा) अशोक भोईर, जिल्हा परिषद सदस्य रंजना संखे, मिताली राऊत, पंचायत समिती सदस्य जितेंद्र संखे, साळुंखे व वीणा देशमुख, विदूर पाटील, वैदही वाढण आदी मान्यवर उपस्थित होते. त्याच बरोबर पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण दुर्गम भागातील बहुसंख्य आदिवासी जोडपी व त्यांचे नातेवाईक तसेच त्यांच्या गावातील वºहाडी मोठ्या प्रमाणात या सोहळ्यात सहभागी झाले होते.आधार प्रतिष्ठानच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात आतापर्यंत सुमारे साडेतीन हजार आदिवासी जोडप्यांचा विवाह पार पाडले असून अनेक वर्षांपासून त्यामार्फत आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या तसेच दारिद्र्यरेषेखालील गरजूंचा विवाह सोहळा थाटात साजरा केला जात असून प्रत्येक वर्षी वधू-वरांना संसारास लागणाऱ्या साहित्याचे वाटप करण्यात येते. जगदीश धोडी यांनी या विवाह सोहळ्यात पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गोरगरीब सहभागी होत असून प्रत्येक वर्षी संख्या वाढत आहे. असे सांगितले तर हा सोहळा सामाजिक उपक्रम असून कर्ज न काढता येथे लग्न कार्य होते तर लग्नानंतर होणाºया मुलांना शाळेत पाठवा. त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नका दारूने समाज बिघडवतो. म्हणून दारूपासून लांब राहा, असे खासदार गावित यांनी सांगितले.
लग्न करण्यासाठी संपूर्ण गावाला भरपूर दारू पाजून मांसाहारी जेवण देणे आदिवासी समाजात अनिवार्य असते, त्यासाठी प्रचंड खर्च येतो तेवढा पैैसा जवळ नसल्याने अनेक आदिवासी कर्ज काढून त्या बदल्यात लगीन गडयाची वेठबीगारी पत्करतात म्हणजे कर्ज फिटेपर्यत त्या नवरा बायकोने कर्ज देणाºयाकडे वेठबिगार म्हणून राबायचे अशी घातक प्रथा या समाजात आहे. तिचे उच्चाटन या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या रूपाने घडवून आणले जाते आहे.