बोईसर पोलीसांनी नागरिकांच्या मदतीने गणेश भक्तांना वाचविले, अतिवृष्टीमुळे भरला नाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 06:14 AM2017-08-31T06:14:47+5:302017-08-31T06:14:57+5:30
पूर्वेकडील बेटेगाव येथील गणेश कुंड या विसर्जन स्थळा बरोबरच परतीचा रस्ता मंगळवारी रात्री चारही बाजूने पुराच्या पाण्याने वेढल्यानंतर विसर्जनास आलेले व अडकून पडलेल्या शेकडो गणेश भक्तांना पोलीसांनी नागरिकांच्या मदतीने वाचविले.
बोईसर : पूर्वेकडील बेटेगाव येथील गणेश कुंड या विसर्जन स्थळा बरोबरच परतीचा रस्ता मंगळवारी रात्री चारही बाजूने पुराच्या पाण्याने वेढल्यानंतर विसर्जनास आलेले व अडकून पडलेल्या शेकडो गणेश भक्तांना पोलीसांनी नागरिकांच्या मदतीने वाचविले. यावेळी अनेकांनी स्वत: पुढे होत जीव धोक्यात घालून बचाव कार्य केले.
मंगळवारी सायंकाळनंतर धुवांधार पावसामुळे बोईसरसह पूर्वेकडील, खैरेपाडा व बेटेगाव रस्ता जलमय झाला. पाच दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी गणेश कुंडाकडे वाजत गाजत कूच करीत असतानाच अतिवृष्टीमुळे नाला दुथडी भरून वाहू लागला.
गणेश कुंडा जवळ काही गणेश भक्त व काही दूध वाले पुराच्या पाण्यात अडकून पडल्याची खबर बेटेगाव येथील नवतरु ण क्र ीडा मंडलाचे अध्यक्ष संदीप घरत व त्यांच्या सहकाºयांचा मिळताच त्यांनी प्रचंड धोका पत्करून दोराच्या सहायाने पुराच्या पाण्यात उतरून सर्वाना सुखरूप बाहेर काढले. तर खैरापाडा येथील राऊळ पेट्रोल पंप आवारा भोवती सुमारे पाच फुट उंच पाणी प्रचंड वेगाने वाहत होते तेथे सुमारे १२०० गणेश भक्त अडकले होते. त्या मध्ये वयोवृद्ध व्यक्ती, स्त्रीया, लहान मुले यांचा समावेश होता. ही खबर मिळताच बोईसरचे पोलिस निरीक्षक विजय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिसंग पाटील हे पोलीस पथकासह घटनास्थळी पोहचले. दरम्यान. पालघर तहसिलदार महेश सागर यांनी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रभाकर राऊळ यांच्याशी संपर्क साधुन या आपत्कालिन परिस्थितीमध्ये मदत करावी अशा सुचना दिल्या.
१२०० भक्त सुखरुप
निरोप मिळताच राऊळ यांनी तातडीने आपल्या सहकार्यांना घेऊन दोर, ट्युब व इतर साहीत्य घेऊन घटनास्थळी पोहोचुन पोलीसांच्या समवेत धोका पत्करून बचाव कार्याला सुरूवात केली. प्रथम शेरू नामक ट्रक ड्रायव्हरला पाण्याच्या बाहेर काढले. तब्बल १२०० भक्तांना बाहेर काढले.