बोईसरची बाजारपेठ सामग्रीने फुलली
By admin | Published: January 13, 2017 05:59 AM2017-01-13T05:59:41+5:302017-01-13T05:59:41+5:30
मकरसंक्रांतीचा सण अगदी तोंडावर आल्याने लागणाऱ्या विविध साहित्यांनी बाजारपेठा संपूर्णपणे
पंकज राऊत / बोईसर
मकरसंक्रांतीचा सण अगदी तोंडावर आल्याने लागणाऱ्या विविध साहित्यांनी बाजारपेठा संपूर्णपणे फुलून गेल्या असून विविध आकाराच्या पतंगांची खरेदी करण्यासाठी बच्चे कंपनी दुकानांपुढे झुंबड करते आहे.
छोट्या मोठ्या आकारातील पतंगावर पंतप्रधान नरेंद्र मोदीचे छायाचित्र झळकले असून त्या सोबत अच्छे दिन आ गये व महानायक असे लिहिण्यांत आले आहे तर छोटा भीम, स्पायडरमॅन डोरेमन, टॉम अँड जेरी, अँग्री बर्ड, इत्यादी कार्टून तर बाहुबली, सुलतान या चित्रपटांच्या नावांबरोबरच अभिनेते, गरबा नृत्य आणि फुलपांखरांची चित्रे छापण्यात आली आहेत.
यातील बहुसंख्य पतंग प्लास्टिकच्या असून त्याची किंमत पांच रूपया पासून पन्नास रूपया पर्यन्त आहे तर पाचशे मीटर मांजाच्या फिरकीची किंमत रुपये१२० आहे हा संपूर्ण माल वापीच्या बाजारपेठेतून आणण्यांत आला असल्याचे दुकानदार सांगतात. मातीची सुगडी, तीळ, भोगीसाठी भाज्या, साधा, चिक्कीचा गूळ, बत्तासे, कुरमुरे, रेवडी, साखर फुटाणे तीळगुळाचे तयार लाडू, वड्या, नारळ,ऊस, बोरे, हळदी कुंकु इ. साहित्य खरेदी साठी महिलांची गर्दी होत आहे नोटबंदीचे आणि पैसे काढण्यावरील निर्बंधांचे सावट सणावर असल्याने गरजे इतकीच खरेदी महिलांकडून केली जात असल्याचे चित्र पहावयास मिळते.
हा सण साजरा केला
पौष कृष्ण प्रतिपदा ह्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जाणार आहे.ह्या दिवशी देवाची पूजा करून भोगीची भाजी (मिश्र भाजी), ज्वारीची अथवा बाजरीची तीळ घालून भाकरी करतात.
मकर संक्र ांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण मानला जातो.
या सणाला मुली, युवती, महिला नवीन अलंकार घालतात. दुपारच्या जेवणाचा बेतही खास असतो. तीळ घातलेल्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि बाजरीची खमंग खिचडी असा लज्जतदार बेत असतो. प्रथम या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात.