बोईसरचा कचरा काही दिवस पडणार कोलवडे डम्पिग ग्राउंडवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 11:30 PM2018-10-09T23:30:21+5:302018-10-09T23:30:46+5:30

पर्यायी व्यवस्था होईतो बोईसर ग्रामपंचायतीचा घनकचरा ज्या जागेमध्ये सध्या टाकण्यात येतो त्याच जागेमध्ये टाकण्यास मज्जाव करू नये असे निर्देश पालघरचे उपविभागीय अधिकारी विकास गजरे यांनी कोलवडे ग्रामपंचायतीला सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये दिले.

Boiser's waste will last for a few days only at the Kolwade dumping ground | बोईसरचा कचरा काही दिवस पडणार कोलवडे डम्पिग ग्राउंडवरच

बोईसरचा कचरा काही दिवस पडणार कोलवडे डम्पिग ग्राउंडवरच

Next

- पंकज राऊत

बोईसर : पर्यायी व्यवस्था होईतो बोईसर ग्रामपंचायतीचा घनकचरा ज्या जागेमध्ये सध्या टाकण्यात येतो त्याच जागेमध्ये टाकण्यास मज्जाव करू नये असे निर्देश पालघरचे उपविभागीय अधिकारी विकास गजरे यांनी कोलवडे ग्रामपंचायतीला सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये दिले. १२ आॅक्टोबरला घनकचरा व्यवस्थापनाच्या जमीनीसाठी बैठक घेण्याची सूचनाही त्यांनी दिल्या.
तारापूर औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या कोलवडे ग्रामपंचायतीने त्यांच्या हद्दीत व शेतजमिनीलगत घनकचरा टाकण्यास बोईसर ग्रामपंचायतीला १ आॅक्टोबरपासून मज्जाव केल्यानंतर दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये उद्भवलेला वाद सामंजस्यांने मिटविण्यासाठी तसेच बोईसर ग्रामपंचायत हद्दीत जागोजागी प्रचंड मोठ्या प्रमाणात साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरून निर्माण झालेला गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी उपविभागीय अधिकाºयांनी ही तातडीची बैठक घेतली.
तिला पालघरचे तहसीलदार महेश सागर, बोईसर व कोलवडे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ, दोन्ही ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक, बोईसर मंडळ अधिकारी, तलाठी, एमआयडीसी व एमपीसीबीचे अधिकारी उपस्थित होते. ज्या ठिकाणी सध्या घनकचरा टाकला जातो. त्या जागेची शनिवारी उपअधीक्षक भूमि अभिलेख पालघर यांच्या प्रतिनिधींनी मौजे कोलवडे गट नं.१६१ व सरावली सर्व्हे नं.३७ ची मोजणी ई. टी. एस.मशीनद्वारे करून गावच्या हद्दीच्या खुणा दाखवून पंचनामा करण्यात आला होता. यावेळी गजरे यांनी सध्या ज्या जागेत बोईसर ग्रामपंचायत कचरा टाकते ती जागा खाजगी मालकीची असल्याचे कोलवडेच्या ग्रामस्थांच्या निदर्शनास आणून देऊन घनकचरा व्यवस्थापनाच्या नियोजनाची जबाबदारी ही स्थानिक प्राधिकरणाची असून तारापूर एमआयडीसी क्षेत्रालगतच्या सर्व ग्रामपंचायतीने एकत्र येऊन प्रस्ताव द्यावा, महसूल विभाग त्यांच्या कडे उपलब्ध असलेली जागा देईल असे सांगितले.

तारापूर मधील जेएसडब्ल्यू स्टील हा उद्योग कचºयापासून खतनिर्मितीचा प्रकल्प टाकण्यास तयार असून दोन ते तीन एकर जमीन महसूल विभागाकडून मिळाल्यास बोईसर व परिसराचा कचरा व्यवस्थापन व विल्हेवाटीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल.
- राजू करवीर,
उपसरपंच, बोईसर ग्रामपंचायत

उपविभागीय अधिकाºयांच्या विनंतीला मान देऊन येत्या आठ दिवसांपर्यंत बोईसरचा कचरा टाकण्यास मज्जाव करणार नाही परंतु त्यानंतर आम्ही पुन्हा कचरा बंद करून कारण आम्ही दहा वर्षापासून कचºयातून निघणारे प्रदूषण व दुर्गंधी सहन करीत आहोत या पुढे सहन करणार नाही
- प्रतिभा संखे
सरपंच, कोलवडे ग्रामपंचायत

Web Title: Boiser's waste will last for a few days only at the Kolwade dumping ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.