शेतात आढळली बॉम्बसदृश वस्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 02:31 AM2018-04-26T02:31:15+5:302018-04-26T02:31:15+5:30

बॉम्ब स्कॉडला पाचारण : ब्रिटिशकाळात झाला होता युद्धसराव

Bombshell objects found in the field | शेतात आढळली बॉम्बसदृश वस्तू

शेतात आढळली बॉम्बसदृश वस्तू

Next


वाडा : तालुक्यातील देवळी या गावात राहाणारे महेंद्र शंकर पाटील यांच्या शेतात शेताच्या बांध बंदिस्तीचे काम सुरू असतांना बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे सावट पसरले असून या वस्तूची तपासणी करण्यासाठी बॉम्ब स्कॉडला बोलावण्यात आले आहे.
दरम्यान या घटनेची माहिती महेंद्र पाटील यांनी तात्काळ वाडा पोलिस स्टेशन व तहसीलदार यांना दिल्याने पोलिस व नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी हे तातडीने घटनास्थळी पोहचून परिस्थितीची पहाणी केली आणि बॉम्ब स्कॉडला बोलाविण्यात आले आहे. याबाबत माहिती देतांना महेंद्र पाटील यांनी सांगितले कि, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटीश शासनाने देवळी व परिसरातील जवळपास तेरा गावे उठवून सैनिकी छावण्या उभारण्यात आल्या होत्या. त्यावेळी प्रात्यक्षिके म्हणून तोफांच्या फैरी झाडल्या जात होत्या व अश्या बॉम्बचे स्फोट या परिसरात होत असत. युद्धानंतर पुन्हा नागरिक पुन्हा वास्तव्यास आल्यानंतर असे बॉम्ब अढळत होते. परंतु ती वस्तू अखंड असल्यामुळे तीचा स्फोट होऊ शकला नसल्याचे दिसत असल्याने तात्काळ वाडा पोलिस स्टेशन व तहसीलदार यांना कळविले. दरम्यान बॉम्ब स्कॉड आल्यावर व सदर संशयीत वस्तूची पहाणी केल्यानंतर याबाबत अधिक खुलासा करण्यात येईल असे नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी यांनी सांगितले.

Web Title: Bombshell objects found in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.