बोंद्रेपाडावासीयांना प्यावे लागते दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 03:57 AM2018-05-19T03:57:07+5:302018-05-19T03:57:07+5:30

खराडे ग्रुपग्रामपंचायतीअंतर्गत बोंद्रेपाडा गावातील पिण्याच्या पाण्यासाठी असलेली एकमेव विहीर अखेर आटल्याने तळाशी असलेले दूषित पाणी येथील नागरिकांना प्यावे लागते आहे.

Bondrepada residents have to drink contaminated water | बोंद्रेपाडावासीयांना प्यावे लागते दूषित पाणी

बोंद्रेपाडावासीयांना प्यावे लागते दूषित पाणी

Next

शेणवा : खराडे ग्रुपग्रामपंचायतीअंतर्गत बोंद्रेपाडा गावातील पिण्याच्या पाण्यासाठी असलेली एकमेव विहीर अखेर आटल्याने तळाशी असलेले दूषित पाणी येथील नागरिकांना प्यावे लागते आहे.
मात्र, यामुळे आरोग्य धोक्यात येण्याची भीती ग्रामस्थांमध्ये आहे. पाण्यासारखी मूलभूत सेवा पुरवणे हे ग्रामपंचायतीचे आद्यकर्तव्य असतानाही ग्रा.पं. पदाधिकारी ही सेवा पुरवण्यास असमर्थ ठरल्याने ग्रा.पं.विरुद्ध ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्र ार करून प्रशासक नेमण्यासाठी निवेदन देण्यात येणार असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. विहिरीतील पाण्याने तळ गाठल्याने फक्त दूषित पाणी उरले आहे. दूषित पाणी भरावे लागत असल्याने गृहिणी त्रस्त आहेत. पंचायत समिती सदस्य रसाळ यांनी टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून ठराव मागितला, परंतु ग्रामपंचायतीने तो ठरावही दिला नसल्याने ग्रामस्थांमध्ये खंत आहे.
>बोंद्रेपाडा नळयोजनेचा प्रस्ताव दिला असेल, पण मंजूर झाला नाही तर काम कसे सुरू करणार. काम सुरू करण्यापूर्वी तांत्रिक, प्रशासकीय मान्यता लागते. - राजेश विशे, जि.प., पाणीपुरवठा समिती सदस्य
>खराडे-बोंद्रेपाडा योजना राष्ट्रीय पेयजल कार्यक्र मांतर्गत नळपाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहे. हा प्रस्ताव तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे.
- आर.एम. आडे, कार्यकारी अभियंता, पंचायत समिती शहापूर

Web Title: Bondrepada residents have to drink contaminated water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.