जिल्ह्यात शाळांची घंटा वाजली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 10:54 PM2019-06-17T22:54:13+5:302019-06-17T22:54:32+5:30

गुलाबाची फुले, चॉकलेट; नव्या वह्या, नवी पुस्तके, खाऊ याने पहिला दिवस झाला गोड

Bongs of schools in the district! | जिल्ह्यात शाळांची घंटा वाजली!

जिल्ह्यात शाळांची घंटा वाजली!

Next

पारोळ : कोरा गणवेश, खांद्यावर नवे दप्तर आणि नव्या वर्गाबद्दलची चेहऱ्यावर न लपणारी उत्सुकता अशा उत्साहपूर्ण वातावरणात नव्या शैक्षणिक वर्षात शाळेची सोमवारी १७ पहिली घंटा वाजली. गेल्या दीड महिन्यापासून शांत असलेली शाळांची प्रांगणे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेली, तर पहिल्यांदा शाळेची पायरी चढणारी मूल आपल्या पालकांचा हात सोडायला नव्हती पालक त्यांची समजूत काढत होते.

वसई जिल्हा परिषद शाळांची संख्याा ९० च्या घरात असून पहिल्या दिवशी अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांच्या प्रवेशद्वारावर रांगोळ्या काढण्यात तर काही शाळा नवीन प्रवेश घेण्याºया विद्यार्थी यांचे स्वागत फुले व खाऊ देऊन केले. काही शाळांनी पाठ्यपुस्तके मुलांना वितरण करण्याचेही आयोजन केले होते. काही शाळांमध्ये स्वच्छता मोहीम राबवून मुलांनी पहिल्या दिवशी स्वच्छतेचा संदेश दिला. तर नवे पुस्तक, नवा गणवेश, नवा वर्ग, नवी शाळा, नवे सवंगडी नवीन शिक्षक, असे सर्व काही नवे नवे सोबत घेऊन नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात केली.

जि. प. शाळेत निघाली बैलगाडीतून मिरवणूक
बोईसर : शासनाच्या आदेशान्वये समग्रशिक्षा अभियानाच्या माध्यमांतून प्रत्येक जि.प. शाळेत प्रवेशोत्सव कार्यक्र म व पटनोंदणी पंधरवडा कार्यक्र माला आज जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात सुरुवात झाली आहे. याच आदेशान्वये जि.प शाळा आंबेदे येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्यांतून शाळेत पहिलीत प्रवेश घेणाºया नवागतांचे स्वागत बैलगाडीच्या मिरवणुकीतून झाले.

कासामध्ये उडाली पालकांची तारांबळ
कासा : डहाणू तालुक्यातील कासा भागात आज शाळेतील शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र वसतिगृहात मुलांना सोडण्यासाठी सकाळी पालकांची मोठी तारांबळ उडाली होती.सोमवारी शाळेचा पहिला दिवस असल्याने शाळेत मुलांनी व पालकांनी मोठी गर्दी केली होती. कासा हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना फूल देवून मुख्यध्यापकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

विक्रमगडमध्ये प्रथमच शाळा तयारी कार्यक्रम
विक्र मगड : तालुक्यातील ५० गावामध्ये प्रथम शिक्षण उपक्र म संस्थेकडून इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश करणाºया मुलांकरीता शाळा तयारी कार्यक्र म मेळावा सुरुवात करण्यात आले आहे. प्रत्येक गावामध्ये सुरुवातीला गावातील अंगणवाडी सेविका यांना शाळा तयारी मेळाव्याविषयी माहिती देण्यात आली. गावातील मुलांची चाचणी कशाप्रकारे घ्यावी व मुलांच्या शिक्षणात युवकांचा सहभाग याबाबत प्रबोधन झाले.

प्रवेशोत्सवासाठी रांगोळ्या ढोल, ताशे अन् तरपा वादन
बोर्डी : तालुक्यातील विविध शाळांमध्ये पिहली इयत्तेतील नवगतांचे स्वागत व प्रवेशोत्सव समारंभ आदींचे आयोजन उत्साही वातावरणात करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले. शाळा प्रवेश दिनी दाखल पात्र विद्यार्थ्यांना हजर करून शाळां-शाळांमध्ये रांगोळी काढण्यात आली होती. त्यांची सजवलेल्या बैलगाडीतून ढोल व घोषणांच्या जयघोषात मिरवणूक काढली.

तलासरीत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
तलासरी : शाळेचा पहिलाच दिवस , विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत तलासरीत करण्यात आले, कुठे मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले तर कुठे प्रथमच शाळेत पहिलीत येणाºया मुलांचे स्वागत झाले. शिक्षकांनी आपल्या दुचाक्या फुलांनी व फुग्यांनी सजवून त्यावरून मुलांना शाळेत आणल्याने त्यांच्यात शाळेची आवड निर्माण झाली होती.

Web Title: Bongs of schools in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.