शिक्षक चव्हाण यांचा विक्रम ‘इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये

By Admin | Published: January 26, 2017 02:55 AM2017-01-26T02:55:08+5:302017-01-26T02:55:08+5:30

येथील के.एल.पोंदा हायस्कूलमधील इंग्रजीचे शिक्षक बी.आर.चव्हाण यांनी अथक परिश्रम करून तयार केलेल्या शैक्षणिक साधनाचा

In the book 'India Book of Records' by Chavan, teacher | शिक्षक चव्हाण यांचा विक्रम ‘इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये

शिक्षक चव्हाण यांचा विक्रम ‘इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये

googlenewsNext

डहाणू : येथील के.एल.पोंदा हायस्कूलमधील इंग्रजीचे शिक्षक बी.आर.चव्हाण यांनी अथक परिश्रम करून तयार केलेल्या शैक्षणिक साधनाचा उपयोग करुन त्यांनी १७० इंग्रजी शब्द वापरु न तब्बल ५०,००,००० (पन्नास लाख) अर्थपूर्ण आणि व्याकरणदृष्टया अचूक इंग्रजी वाक्ये तयार करण्याचा नवीन विक्र म केला आहे. त्याची नोंद इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. ने घेतली असून कमीतकमी शब्दांचा वापर करून जास्तीतजास्त वाक्ये बनविणे, असा हा विक्रम आहे. याबद्दल त्यांचा सत्कार संस्थेचे मानद सचिव के.एन.पोंदा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेचे सह. सचिव प्रदीप कर्नावट, पी.सी.तन्ना, राजेंद्र केळकर, कमिटी मेंबर्स सुनील पोंदा , सुधीर कामत, मुख्याध्यापक एम.जी. ताजने, श्रद्धा पाटील, उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: In the book 'India Book of Records' by Chavan, teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.