शाळाप्रवेशदिनीच मिळणार पुस्तके; १६ लाख ५ हजार १०९ पुस्तके मोफत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 02:23 AM2018-06-08T02:23:53+5:302018-06-08T02:23:53+5:30
१ ली ते ८ वी इयत्तेच्या विद्यार्थ्याना शाळेच्या पाहिल्याच दिवशी समारंभपूर्वक नव्याकोर्या पाठ्यपुस्तकांचे मोफत वाटप सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत केले जाणार आहे.
- हितेन नाईक
पालघर : १ ली ते ८ वी इयत्तेच्या विद्यार्थ्याना शाळेच्या पाहिल्याच दिवशी समारंभपूर्वक नव्याकोर्या पाठ्यपुस्तकांचे मोफत वाटप सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत केले जाणार आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागा मार्फत आठ तालुक्यांमधील ३ लाख ४ हजार ६८० विद्यार्थ्यांकरिता १६ लाख ५ हजार १०९ पाठ्यपुस्तकं उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिकचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी लोकमत ला दिली.
गतवर्षी प्रमाणेच यंदाही शाळेच्या पाहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांंच्या हाती नवी कोरी पुस्तकं दिली जाणार असल्याने त्यांना खऱ्या अर्थाने आनंददायी शिक्षणाची प्रत्यक्ष अनुभूती मिळणार आहे. या मध्ये जिल्हा परिषद शाळा, शासकीय आश्रमशाळा आणि खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील १ ली ते ८ वी इयत्तांमधील विद्यार्थ्यांंचा समावेश असणार आहे. पालघर जिल्हयातील आठ तालुक्यांसाठी शिक्षण विभागाकडून गतवर्षी विविध विषयांच्या १६ लाख ९२ हजार ५७८ पुस्तकांची मागणी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाकडे करण्यात आली होती. तर त्या पैकी १६ लाख ४४ हजार ७११ पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात आली होती.तर या शैक्षणिक वर्षाकरिता ३ लाख ४ हजार६८० विद्यार्थ्यांकरिता १६ लाख ५ हजार १०९ इतका पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली आहे.
पालघर तालुक्यातील १ ली ते ८ वी च्या ५० हजार ४८२ विद्यार्थ्यांकरिता २ लाख ७४ हजार २०३ पाठ्यपुस्तकें, वसई ६८ हजार २९८ विद्यार्थ्यांंकरिता ३ लाख ७४ हजार ७५९ पाठ्यपुस्तकं , डहाणू मध्ये ६७ हजार १८६ विद्यार्थ्यांकरिता, ३ लाख ४२ हजार ४४१ पाठ्यपुस्तकें, तलासरी मध्ये २९ हजार ८३६ विद्यार्थ्यांंकरिता १ लाख ५७ हजार ९३ पाठ्यपुस्तकं, जव्हार २१ हजार ३५२ विद्यार्थ्यांंकरिता १ लाख ८ हजार 645 पाठ्यपुस्तकं, मोखाडा मध्ये १४हजार ९७० विद्यार्थ्यांकरिता ७७ हजार ७३३ पाठ्यपुस्तकं , वाडा २७ हजार ७५४ विद्यार्थ्यांकरीता १ लाख ४४ हजार ९८१ पाठ्यपुस्तकं आणि विक्रमगड तालुक्यात २४ हजार ८३१ विद्यार्थ्यांंकरिता १ लाख २५ हजार ३१७ पाठ्यपुस्तक अशी संपूर्ण जिल्ह्यातील ३ लाख ४ हजार ६८० विद्यार्थ्यांंसाठी १६ लाख ५ हजार १०९ विविध विषयांच्या पाठ्यपुस्तकांचा समावेश आहे. तर गतवर्षी विक्र मगड तालुक्यात १ लाख ३८ हजार २५ , वाडा - १ लाख ५३ हजार ११२ , डहाणू-३ लाख ७९ हजार १५७ , मोखाडा -७० हजार ७३८, जव्हार -७६ हजार ९६९, वसई -३ लाख ८३ हजार ४८०, पालघर - २ लाख ७६ हजार ४४७, तलासरी -१ लाख ६६ हजार ७६५ अशी एकूण १६ लाख ४४ हजार ७११ इतकी सर्व विषयांची मिळून पाठ्यपुस्तकं उपलब्ध करून देण्यात आली होती.
शाळांमधून पाठ्यपुस्तकं उपलब्ध होऊ लागल्याने विशेषत: गरीब आदिवासी पालकांचा आर्थिक फायदा होणार आहे. शिवाय पाल्याच्या शाळेत जाऊन शिक्षकांकडून पाठ्यपुस्तकांची यादी घ्या, त्यानंतर पुस्तकांच्या दुकानात जाऊन रांगेत उभे राहून घेतलेली पुस्तकं पुन्हा शाळेत जाऊन वर्गशिक्षकांना दाखवा हा पालकांचा त्रास आणि डोकेदुखी वाचणार आहे.
जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र १ ली व ८ वी च्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलल्याने नवीन पाठ्यपुस्तके उपलब्ध झाल्या नंतर तात्काळ त्याचे वाटप करण्यात येईल.
- राजेश कंकाळ,
शिक्षणाधिकारी, प्राथमिक