बोर्डीत मुसळधार, पश्चिम रेल्वे मंदावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 02:26 AM2017-07-19T02:26:31+5:302017-07-19T02:26:31+5:30
गुजरात राज्याला पावसाने झोडपल्याने मंगळवार, १८ जुलै रोजी पश्चिम रेल्वेच्या बलसाड रेल्वे स्थानकातील रु ळ पाण्याखाली जाऊन वाहतूक सेवा ठप्प झाली.
- लोकमत न्यूज नेटवर्क
बोर्डी : गुजरात राज्याला पावसाने झोडपल्याने मंगळवार, १८ जुलै रोजी पश्चिम रेल्वेच्या बलसाड रेल्वे स्थानकातील रु ळ पाण्याखाली जाऊन वाहतूक सेवा ठप्प झाली. दरम्यान या मार्गावरील लांबपल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्याने डहाणूसह पालघर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना असुविधेचा सामना करावा लागला. तर डहाणू स्थानकापासून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चाकरमान्यांनी उपनगरीय सेवेचा आधार घेतला. बोर्डी परीसरालाही पावसाने झोडपले.
सीमेलगतच्या गुजरात राज्यात मुसळधार पावसाने सखल भागात पाणी भरले. मंगळवारी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत बलसाड २६ मिमी, पारडी ३० मिमी, वापी ६० मिमी आणि उंबरगाव ४० मिमी या भागात पावसाची नोंद झाली. पश्चिम रेल्वेच्या बलसाड स्थानकातील रेल्वे रु ळ पाण्याखाली गेल्याने पहाटे धावणाऱ्या अप आणि डाउन मार्गावरील गाड्या रद्द तर काही उशिराने धावत असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले होते.
त्यामध्ये अप मार्गावरील बलसाड फास्ट पेसेंजर (५९०२४), व फ्लाइंग राणी (१२९२२) या गाड्यांचा समावेश होता. मुंबईकडे जाणाऱ्या सीमाभागातील बहुतांश चाकरमान्यांची भिस्त या गाड्यांवर असल्याने अनेकांना कामाला दांडी मारावी लागली. तर काहींनी उपनगरीय गाड्यांचा आधार घेत कार्यालय गाठले. गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या उशिराने धावत होत्या. दरम्यान दुपारनंतर वेळापत्रक सुरळीत झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला.
अशी उडाली पश्चिम रेल्वेची दाणादाण
सुरतवरून दररोज मुंबईला येणारी फ्लार्इंग राणी एक्सप्रेस तसेच सुरत विरार शटल आणि वलसाड वरून मुंबईकडे शासकीय व खाजगी क्षेत्रातील चाकरमान्यांना घेऊन येणारी वलसाड जलद पॅसेंजर या ट्रेन रद्द करण्यांत आल्या.
पश्चिम रेल्वेवरून मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या सौराष्ट्र मेल, लोकशक्ती एक्सप्रेस, अमृतसर मुंबई, सौराष्ट्र जनता, चार ते पाच तास उशिराने धावत होत्या, विशेष म्हणजे चाकरमानी त्यामुळे आपल्या कार्यालयात वेळेवर पोहोचू शकले नाहीत.
तर काहींनी नाईलाजास्तव अखेर दांडी मारली, गुजरात येथील पूरस्थितीमुळे मुंबईकडे येणाऱ््या सर्व एक्सप्रेस गाड्या अनिश्चित काळासाठी उशिराने धावत होत्या मुंबईकडे जाणाऱ््या अनेक गाड्या रद्द करण्यांत आल्या
एक्सप्रेस ट्रेन वेळेवर न आल्याने तिच्यासाठी थांबलेल्या वैतरणा-डहाणू येथील सर्व नोकरदार वर्गाने आज दांडी मारली. ट्रेनच्या उशीरामुळे सतत माराव्या लागणाऱ्या दांडीला वैतागून वैतरणा-डहाणू भागातील प्रवाशांनी पहाटे नवी लोकल सुरू करण्याची मागणी केली आहे
गुजरातकडे जाणाऱ्या प्लार्इंग राणी, वलसाड फास्ट पँसेंजर, इंटरिसटी एक्सप्रेस रद्द करण्यांत आल्या आहेत.