बनावट नोटा वटवणारे दोघे वाड्यात गजाआड

By admin | Published: May 8, 2016 02:54 AM2016-05-08T02:54:16+5:302016-05-08T02:54:16+5:30

तालुक्यातील कुडूस येथील आठवडा बाजारात बनावट नोटा देऊन वस्तू घेणाऱ्या एका टोळीला कुडूस पोलिसांनी रंगेहाथ पकडून गजाआड केले. त्यांच्याकडून १ लाख ७७ हजाराच्या

Both the fake currency notes are known in the castle | बनावट नोटा वटवणारे दोघे वाड्यात गजाआड

बनावट नोटा वटवणारे दोघे वाड्यात गजाआड

Next

वाडा : तालुक्यातील कुडूस येथील आठवडा बाजारात बनावट नोटा देऊन वस्तू घेणाऱ्या एका टोळीला कुडूस पोलिसांनी रंगेहाथ पकडून गजाआड केले. त्यांच्याकडून १ लाख ७७ हजाराच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. ही घटना शक्रवारी सायंकाळी घडली. अनिकुल शेख व रेजाऊल हुसेन अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
कुडूस येथे शुक्र वारी आठवडा बाजार भरतो. या आठवडा बाजारात वस्तूंची खरेदी करण्यासाठी गर्दी असते. या गर्दी चा फायदा घेऊन बनावट नोटा वटविणारी टोळी येथे सक्रि य झाली होती. ते बनावट नोटा देऊन सामान खरेदी करत असत. या बाबतची माहिती कुडूस पोलिसांना मिळाली होती. शुक्रवारी सायंकाळी कुडूस पोलीस दूरक्षेत्राचे सहायक पोलीस उपनिरीक्षक आर. बी. भोईर, पोलीस नाईक व्ही. आर. आगिवले, आर. एस. भेरे, के. एस. माळी, एम. बी. पाटील या पोलिसांच्या पथकाने सापळा रचून एका व्यापाराला बनावट नोटा देताना आरोपींना रंगेहाथ पकडले. त्यांच्या कडून एक हजाराच्या ९५ नोटा तर ५०० च्या ८२ हजाराच्या नोटा हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय चौधर करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Both the fake currency notes are known in the castle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.