सहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली पंधरा लाखांची लाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 12:05 AM2019-01-02T00:05:04+5:302019-01-02T00:05:25+5:30
बनावट कागद पत्रांबाबत गुन्हा दाखल करण्यात येऊ नये या साठी येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरिक्षक राजेंद्र नरोटे यांच्याविरुद्ध पंधरा लाखाची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
- सुरेश काटे
तलासरी : बनावट कागद पत्रांबाबत गुन्हा दाखल करण्यात येऊ नये या साठी येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरिक्षक राजेंद्र नरोटे यांच्याविरुद्ध पंधरा लाखाची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सहा पोलिस व अन्य एका इसमाविरुद्धही गुन्हा दाखल झाला.
तालुक्यातील मौजे उधवा येथे काही इसमानी जिल्हाधिकाऱ्यांची बनावट सही शिक्का बनवून बनावट कागदपत्राद्वारे एन. ए. आॅर्डर बनवून धार्मिक स्थळाचे बांधकाम केले होते. या बाबत तलासरीतील नागरिक बजरंग शहा यांनी तलासरी पोलीस स्टेशनला २८ सप्टेंबर २०१८ ला तक्रार अर्ज दिला होता त्याचा तपास तलासरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र नरोटे करीत होते
त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी सहा पोलीस निरीक्षक राजेंद्र नरोटे, कर्मचारी संदीप राजगुरू व बजरंग शहा यांनी १५ लाखांची लाच मगितल्याचा आरोप करून तशी तक्रार पालघर लाच लुचपत विभागाकडे केल्याने त्याची पडताळणी १४ ते १७ डिसेंबर या काळात करण्यात येऊन सोमवारी रात्री तलासरी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला.
वास्तविक तलासरी भागात अनेक बांधकामे सुरू असून त्याबाबतची कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेश म्हणून दाखविले जातात पण त्याची शहानिशा तलासरी महसूल विभाग करीत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही ती होत नसल्याने बनावट कागद पत्रे बनविणाº्या टोळ्या कार्यरत आहेत हे यावरुन दिेसते.
तक्रारदाराचेच नाव आले आरोपी म्हणून
लाचलुचपत विभागाने दाखल केलेल्या गुन्ह्यात तक्र ारदार बजरंग शाह यांचेही आरोपी म्हणून नाव आले याबाबत त्यांनी सांगितले बनावट एन. ए. आॅर्डर बनविल्या विरुद्ध मी तक्रार केल्याने त्यांनी मला या प्रकरणात अडकवले आहे त्यामुळे बनावट एन. ए. आॅर्डर बनविणाºया विरु द्ध कडक कारवाई करण्यात यावी असे सांगितले.
बोगस कागदपत्रे तयार करणाºयांना महसूलचेच पाठबळ असते त्यामुळे त्याची छाननी करण्यात कोणालाच स्वारस्य नसते. कारण आपल्या छुप्या अनुमतीने जे घडले त्याची शहानिशा करून आपल्या चिरीमीरीवर कोण कुºहाड मारुन घेणार?