घोलवड गावातील पूल खचला, इंधन, वेळेचा अपव्यय
By admin | Published: November 26, 2015 01:24 AM2015-11-26T01:24:26+5:302015-11-26T01:24:26+5:30
मुख्य रस्त्यावर गटारावर बांधलेला काँक्रीटचा जीर्ण पूल अखेर तुटला असून आता पूर्ण कोसळण्याच्या मार्गावर आहे. परिणामी, येथून होणारी मोठ्या व अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
घोलवड : मुख्य रस्त्यावर गटारावर बांधलेला काँक्रीटचा जीर्ण पूल अखेर तुटला असून आता पूर्ण कोसळण्याच्या मार्गावर आहे. परिणामी, येथून होणारी मोठ्या व अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
मोठ्या तसेच अवजड वाहनांसाठी घोलवड गावातून सागरी किनाऱ्यालगत जाणारा हा एकमेव मार्ग असल्याने सर्व मोठी व अवजड वाहने याच मार्गाने जात होती.
वास्तविक, या पुलात अवजड वाहनांचा भार पेलण्याची क्षमता नसतानाही अशी वाहतूक सर्रास सुरू होती. परिणामी, या मार्गाची दुरवस्था होऊन अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्याच्या पूर्वेकडील भागाकडून हा पूल तुटण्यास याआधीच सुरुवात झाली होती. याविषयी ९ आॅक्टोबरच्या ‘लोकमत’च्या अंकात ‘गटारावरील पूल तुटला; वाहतूक ठप्प होणार?’ या मथळ्याखाली सर्वप्रथम वृत्त प्रसिद्ध केले होते. मात्र, सा.बां. विभागाने याची कोणत्याही प्रकारची दखल तर घेतली नाहीच, पण चक्क डोळेझाक केली. सा.बां. विभाग हा पूल पूर्णपणे तुटून मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहत होता काय, असा संतप्त सवाल प्रवासी व नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
ग्रामीण भागातील रस्त्यांच्या समस्येबाबत सातत्याने तक्र ारी होत असतानादेखील शासकीय यंत्रणा त्यावर कार्यवाही करण्यात
अपयशी ठरताना दिसत आहे. (वार्ताहर)
डहाणूच्या कंक्र ाडी रेल्वे पुलाची उंची कमी असल्याने बस, ट्रक व उंचीने मोठी असलेली अवजड वाहने डहाणू शहरातून कंक्र ाडी रेल्वे पुलाखालून कोसबाडमार्गे घोलवडकडे येऊ शकत नाहीत. परिणामी, या वाहनांना सागरी मार्गावरून गुजरात राज्याकडे जाण्याचा एकमेव पर्याय होता. तो ही पूल तुटल्यामुळे मार्ग बंद झाला आहे. अशा परिस्थितीतवाहतूक कोसबाडमार्गे डहाणूच्या कंक्र ाडी रेल्वे पुलापर्यंत जात आहे.एसटी बस प्रवाशांना डहाणू रेल्वे स्थानकापर्यंत सुमारे अर्धा किलोमीटर व डहाणू बस स्थानकापर्यंत दीड किलोमीटरची पायपीट करून जावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून वृद्ध व विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या पुलाच्या दुरु स्तीविषयी घोलवड ग्रामपंचायतीने लेखी निवेदन सा.बां. विभागास महिनाभरापूर्वी दिले होते. मात्र, त्याची दखल घेऊन कार्यवाही करण्यात आली नाही.