गटारावरील पूल तुटला; वाहतूक ठप्प होणार?
By admin | Published: October 8, 2015 11:08 PM2015-10-08T23:08:22+5:302015-10-08T23:08:22+5:30
येथील मुख्य रस्त्यावरील गटारावर बांधण्यात आलेला सिमेंट कॉंक्रीटचा पूल जीर्ण अवस्थेत असून एका बाजूने तुटला आहे. घोलवड गावातील मुख्य रस्ता याच नाल्यावरुन
घोलवड : येथील मुख्य रस्त्यावरील गटारावर बांधण्यात आलेला सिमेंट कॉंक्रीटचा पूल जीर्ण अवस्थेत असून एका बाजूने तुटला आहे. घोलवड गावातील मुख्य रस्ता याच नाल्यावरुन जात असल्याने नेहमी वाहनांची ये- जा व प्रवाशांची वर्दळ सुरु असते. मोठ्या व अवजड वाहनांसाठी घोलवड गावातून समुद्रमार्गे जाणारा हा एकमेव मार्ग असल्याने सर्व मोठी व अवजड वाहने याच मागार्ने जात आहेत.
अवजड वाहनांचा भार पेलण्याची क्षमता या नाल्यात नसतानाही अशी वाहतूक सर्रासपणे सुरु आहे. परिणामी रस्त्याचीही दुरावस्था होऊन अक्षरश: चाळण झाली आहे. व गटारावरील सिमेंट नाला रस्त्याच्या पूर्वेकडिल भागात तुटण्यास सुरुवात झाली आहे.
हा नाला तुटल्यास अवजड व मोठ्या वाहनांची वाहतूक घोलवड गावातून पूर्णपणे बंद होण्याची भीती प्रवासी व नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत असून घोलवड गावातील रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यताही बळावली आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या समस्येबाबत सातत्याने तक्रारी होत असताना देखील शासकीय यंत्रणा त्यावर कार्यवाही करण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. (वार्ताहर)
या नाल्याच्या दुरुस्ती विषयी लेखी निवेदन ग्रामपंचायत व सा. बा. विभागाला दिले आहे. तरी या समस्येचा गांभीयार्ने विचार करून त्वरित दुरुस्तीचे काम झाले पाहीजे
-हरकचंद शहा,
माजी सरपंच, घोलवड