पूल खचून महिना उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 02:47 AM2018-04-30T02:47:32+5:302018-04-30T02:47:32+5:30

तालुक्यातील वानगाव-वधना या रस्त्यावरील एैना येथील ब्रिटीशकालीन पूल महिनाभरापूर्वी खचला आहे. सध्या येथील पर्यायी वाहतूक एका कच्चा रस्त्याने होत असून पूल उभारणीची निविदा प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.

The bridges of the pool reversed a month | पूल खचून महिना उलटला

पूल खचून महिना उलटला

Next

शौकत शेख  
डहाणू : तालुक्यातील वानगाव-वधना या रस्त्यावरील एैना येथील ब्रिटीशकालीन पूल महिनाभरापूर्वी खचला आहे. सध्या येथील पर्यायी वाहतूक एका कच्चा रस्त्याने होत असून पूल उभारणीची निविदा प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यातच पालघर लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता सुरु असल्याने पुलाच्या कामाला अडथळा निर्माण झाला आहे.
डहाणू सा.बां. विभाग अंतर्गत डहाणू-नाशिक राज्य मार्गाबरोबरच झाई-बोर्डी, वानगांव-वधना आशागड, आंबकेसरी, मोडगाव, उधवा, कासा, सायवन, वसा-करजगाव, घोलवड-कोसबाड, वानगांव, आगासन-चंडीपाडा, ऐना, दाभोण, सरावली-सावटा, असे एकूण २५२ किमीच्या रस्त्यावर एकूण ७० पूल आहेत. त्यापैकी बहुसंख्य पुलाची दयनीय अवस्था झाली आहे.
पावसाळयाच्या दिवसांत येथील पूल पाण्याखाली जात असल्याने बारा, पंधरा तास असंख्य गावांचा संपर्क तुटत असतो. मात्र, वर्षानुवर्षे कोणतीच उपाय योजना केली जात नाही. गेल्या एक महिन्यापसून वानगांव-वधना या प्रमुख जिल्हा मार्गावरील एैना येथील जिर्ण व जुनाट कमकुवत होऊन त्यातील मोठ मोठे दगड निखळून गेल्याने त्याचा स्लॅब खचला आहे. हा पूल गेल्या ७० वषापुर्वीचा आहे. तो अरूंद असून दिवसेंदिवस या रस्त्यावरून मोठया प्रमाणात अवजड वाहने जात असल्याने पूल खचला आहे. सा.बां. विभागाने तात्पूरती वाहतूकीसाठी पर्यायी व्यवस्था केली असली तरी महिना उलटून ही नवीन पूलाचे बांधकाम सुरू होत नसल्याने टिका होत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पूल तयार होणे गरजेचे असतांना कोणतीच हालचाल होेत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
 

Web Title: The bridges of the pool reversed a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.