भाईंदरमधील कराटेपटूंची चमकदार कामगिरी; ६० पदकांची कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 10:51 PM2018-12-12T22:51:30+5:302018-12-12T22:51:45+5:30
सातारा येथे झाली राष्ट्रीय मार्शल आर्ट चॅम्पियनशिप स्पर्धा, खेळाडूंवर कौतुकांचा वर्षाव
भाईंदर : मीरा-भाईंदर येथील ३४ कराटेपटूंनी सातारा येथे झालेल्या ३१ व्या राष्ट्रीय मार्शल आर्ट चॅम्पियनशीपमध्ये चमकदार कामगिरी करत १५ सुवर्ण पदकांसह मीरा-भाईंदर शहराच्या खात्यात तब्बल ६० पदकांची भर टाकली.
कराटेसह स्केटिंगमध्ये शहराचे नाव जागतिक स्तरावर पोहचले असून यातील काही क्रीडापटूंनी तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये विक्रमाची नोंद केली आहे. शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्यात आले असतानाच सातारा येथे झालेल्या राष्ट्रीय मार्शल आर्ट चॅम्पियनशिप या स्पर्धेत ३४ कराटेपटूंनी ६० पदकांची लयलूट केली. यात १५ सुवर्णासह १९ रौप्य व २६ कांस्य पदकांचा समावेश आहे.
राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, आसाम, गोवा व गुजरातमधील ६०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यातील मीरा-भाईंदरमधील कुशल म्हात्रे, पवन पुजारी, धृती शेट्टी, सोहम झरेकरने, जिया खान, मुस्तफा रामपुरावालाने कुमिते प्रकारात प्रत्येकी सुवर्ण तर काता प्रकारात प्रत्येकी रौप्य पदक अद्वैत पिल्लई, लवकुश कश्यप, पार्थ तावडेने कुमिते मध्ये प्रत्येकी कांस्य तर कातामध्ये प्रत्येकी रौप्य, तनुश्री खंडेलवाल, जान्हवी सोनावणे, आकाश राठोड, सलोनी चिंगळेने कुमितेमध्ये प्रत्येकी रौप्य तर काता मध्ये प्रत्येकी कांस्य, सोहम नंदीने कुमितेमध्ये सुवर्ण, सिद्देश गावडे, पार्थ पारेखने कुमितेमध्ये प्रत्येकी रौप्य, सोनित चेत्रीने काता मध्ये सुवर्ण तर कुमितेमध्ये रौप्य, एहसान शेख, जमिला रामपुरावाला, सैज्ञा भोगटे, प्रथम जैनने कुमिते व कातामध्ये प्रत्येकी कांस्य, अध्यान सिंघानियाने कातामध्ये सुवर्ण, विधी खेमानी, सुधीक्षा विश्वनाथ, माधवी तावडेने कुमितेमध्ये प्रत्येकी सुवर्ण तर कातामध्ये प्रत्येकी कांस्य, छवी जैनने कुमिते व कातामध्ये प्रत्येकी सुवर्ण, अली असगर, निधीश शेट्टीने कुमितेमध्ये प्रत्येकी कांस्य, हर्षिल खानने कुबोदो व कुमिते मध्ये प्रत्येकी कांस्य, श्लोक शेट्टी, शाझेब शेखने कातामध्ये प्रत्येकी कांस्य, मनवीत शेट्टीने कुबोदो मध्ये कांस्य तर कुमितेमध्ये सुवर्ण, साई मांजरेकरने कुमितेमध्ये कांस्य तर कातामध्ये रौप्य, स्मर्णी राणेने कुमिते व कातामध्ये प्रत्येकी रौप्य पदक मिळवले. या कराटेपटूंना प्रशिक्षक विजय शिगवण, विनायक रेडकर, अरूण मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.