वसई-विरारचा करवाढ नसलेला अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 01:23 AM2019-02-23T01:23:54+5:302019-02-23T01:24:21+5:30

दिव्यांग, महिला, उपवर कन्या व क्रीडापटूंचा केला विचार : नव्या पाणीयोजना, रु ग्णालये, अत्याधुनिक क्रीडासंकुले उभारणार

Budget without budgeting for Vasai-Virar | वसई-विरारचा करवाढ नसलेला अर्थसंकल्प

वसई-विरारचा करवाढ नसलेला अर्थसंकल्प

googlenewsNext

वसई : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समितीने आगामी २०१९-२० या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्र शुक्र वारी झालेल्या विशेष महासभेत सादर केले. या वर्षात २०२० कोटी रु पये खर्च आणि २४२ कोटी रु पये शिलकीचे एकूण १८५७ कोटी ६८ लाख रु पये रक्कमेचे अर्थसंकिल्पय अंदाजपत्रक सादर करण्यात आले. त्यात नवीन पाणी योजना, रु ग्णालयांची निर्मिती, अत्याधुनिक क्रीडा संकुल आदींचा समावेश आहे. कोणतीही करवाढ नसल्याने या अर्थसंकल्पात आगामी निवडणूकीचा विचार केला आहे.

महापालिकेच्या २०१९-२० या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक आयुक्तांनी मागील आठवड्यात सादर केला होता. त्यात सुधारण करून स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांनी ते शुक्रवारी सायंकाळी महासभेत सादर केला. आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात २५९ कोटी रु पयांची शिल्लक दाखिवण्यात आली होती आणि २ हजार २६२ कोटी रु पयांचे अंदाजपत्रक बनविण्यात आले होते. स्थायी समितीने यात अनेक सुधारणा केल्या आहेत. २०१९-२० मध्ये प्रारंभिक शिल्लक ४०५ कोटी १५ लाख १ हजार ८५७ कोटी ६८ लाख जमा आणि २ हजार २० कोटी ६७ लाख रु पये खर्च असा २४२ कोटी रु पये शिल्लकीचे असे एकूण १ हजार ८५७ कोटी ६८ लाख रु पयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले.
यात आरोग्य सेवा संपुर्णपणे मोफत देण्यात आली आहे. वसई कौलसिटी येथे २०० खाटांचे मिल्टस्पेशालिटी रु ग्णालय आणि नालासोपार्याच्या आचोळे येथे ३०० खाटांचे अत्याधुनिक सुविधा असलेले रु ग्णालय प्रस्तावित करण्यात आले आहे. देहरजा नदीवर आखण्यात आलेल्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी पालिकेने शासनाच्या जलसंपदा विभागाकडे १६७ कोटी आणि सुसरी प्रकल्पासाठी १६ कोटी रूपये जमा केले आहेत. या योजनेमुळे वसई विरार शहरास प्रतिदिन ४९० दशलक्ष लीटर पाणी मिळणार आहे. देहरजी, सुसरी, सातिवली, राजावली, कामण, कवडास बंधार्डयाची उची वाढविण्याची तरदूत करण्यात आली आहे. खोलसापाडा १ व २ योजनेस मंजुरी देण्यात आली आहे. अमृत अभियानाअंतर्गत १३० कोटी रु पयांच्या अतिरिक्त पाणी पुरवठा योजनेस मंजूरी. त्यासाठी २३३ कोटी ९९ लाख रु पयांची तरतूद करण्यात आली आहे.

शहरात नवीन उड्डाणपूलांची तरतूद. त्यासाठी ४५ कोटी रु पयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील सार्विजनक वाचनालयांना अनुदान जाहीर करण्यात आले आहे. त्यासाठी ५ कोटी २३ लाख रु पयांची तरतूद करण्यात आली आहे. दिव्यांगांसाठी अनेक योजना या अंदाजपत्रकात मांडण्यात आल्या आहेत. दिव्यांग व विशेष व्यक्तींच्या कल्याणकारी योनजा राबविणार्Þया संस्थांना ४ कोटी ५० लाख रु पयांचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे. वरदायिनी योजने अंतर्गत मागासवर्गीय समाजातील विधवा, निराधार, परितक्त्या आणि घटस्फोटीत महिलांच्या २ मुलींच्या विवाहासाठी, तसेच अंध आणि दिव्यांगांच्या २ मुलीच्या विवाहासाठी २५ हजार रु पयांची तरतूद करण्यात आली आहे

आधारमाया योजने अंतर्गत कुष्ठरोगाने बाधित आणि वयाची ६० वर्षे पुर्ण केलेल्या एकाकी व्यक्तीस दरमहा ३ हजार रु पयांचे अनुदान दिले जाणार आहे. ज्ञानमयी योजना- ७५ टक्क्यांहून अधिक अंधत्व किंवा अपंगत्व असणार्या विद्यार्थ्यांना दरमहा १ हजार रु पया अनुदान मिळणार आहे. विधवा महिलांच्या मुलीच्या विवाहांसाठी अनुदान दिले जाणार आहे. विरारच्या म्हाडा वसाहतीनिजक आॅलिंपिक दर्जाचा जलतरण तलाव तयार करण्यात येणार आहे. त्याशिवाय या क्रि डा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचे रिनंग ट्रॅक, उंच उडी, गोळा फेक, भाळा फेक, फुटबॉल मैदान बनविले जाणार आहे. पालिकेतर्फे शहरात कृत्रिम जंगल तयार करून त्यात हरण पार्क, पक्षी पार्क, निसर्ग उद्यान विकिसत केले जाणार आहे. त्यासाठी या वर्षाच साडेतीन कोटी रु पयांची तरतूद करण्यात आली आहे. पालिकेच्या पाणी पुरवठा व पथिदव्यामधील उर्जा बचतीसाठी उर्जा संवर्धन तंत्रज्ञान पथदर्शी प्रकल्प राबविला जाणार आहे
शहराच्या विविध भागात चौक, वाहतूक बेटे, उद्याने थे विविध जातीधर्माच्या स्थानिक लोकांची ओळख पटविणारी शिल्पे उभारली जाणार आहेत. अत्याधुनिक अग्निशमन विभाग उभारला जाणार आहे. त्यात ७० मीटर उंच शिडी, फायर वॉटर मॉनिटर उपकरण, हॅजमॅट व्हॅन घेणार आदींचा समावेश केला जाणार आहे. शहरातील विहिरीं, तलावांचे जतन केले जाणार आहे. सांडपाण्याचा पुर्नवापर करण्याचा निर्णयÞ. पावसाळी पाण्याचे संकलन, विहिरी आणि कूपनलिकांचे पुर्नभरण करणाÞऱ्या संस्था व्यक्तींना प्रोत्सहान दिले जाणार आहे.

कोणतीही करवाढ व दरवाढ न करता सर्वसामान्य लोकांचे हित लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प बनविण्यात आलेला आहे. महिला बालकल्याण व मागासवर्गीय कल्याणकारी योजनेत वाढ करण्यात आली असून, यावेळी २० कोटींची वाढ केलेली आहे. वेगवेगळ्या योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकांना होणार आहे.
- सुदेश चौधरी, स्थायी समिती सभापती

Web Title: Budget without budgeting for Vasai-Virar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.