हॉटेलसाठी राखीव भूखंडावर बनावट कागदपत्राद्वारे निवासी इमारत , नालासोपाऱ्यात बिल्डरला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 06:19 AM2018-05-08T06:19:27+5:302018-05-08T06:19:27+5:30
वसई विरार मनपाच्या कार्यक्षेत्रात बनावट सीसी बनवून बांधकामे सुरु असल्याचे, तसेच नालासोपाºयात सर्वाधिक बनावट सीसी आणि कागदपत्रांच्या आधारे इमारती बांधण्याचा सुळसुळाट असल्याचे अनेक वेळा स्पष्टही झाले आहे व नालासोपारा पोलीस स्टेशनला गुन्हेही दाखल झालेले आहे.
पारोळ : वसई विरार मनपाच्या कार्यक्षेत्रात बनावट सीसी बनवून बांधकामे सुरु असल्याचे, तसेच नालासोपाºयात सर्वाधिक बनावट सीसी आणि कागदपत्रांच्या आधारे इमारती बांधण्याचा सुळसुळाट असल्याचे अनेक वेळा स्पष्टही झाले आहे व नालासोपारा पोलीस स्टेशनला गुन्हेही दाखल झालेले आहे. यानंतर बनावट सीसी बनवून बांधकाम करणाºया बिल्डरांमध्ये आणि ग्राहकांमध्ये खळबळ माजली होती. पुन्हा एकदा नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये बनावट सीसी आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे इमारत बांधल्याप्रकरणी जमीनमालक आणि बांधकाम करणाºया सहा बिल्डरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
नालासोपारा शहरातील पश्चिमेकडील हनुमान नगर येथे हॉटेलसाठी परवानगी असताना बनावट कागदपत्रांच्या व बनावट सीसीच्या साह्याने ४ माळ्याची अनधिकृत इमारत बांधली असून त्याच्याच बाजूला मनपाची कोणतीही परवानगी न घेता सिद्धिविनायक नावाची ७ माळ्याची आणि कॉमन फॅसिलिटी एरियामध्ये दिव्या नावाची ४ माळ्याची अनधिकृत इमारत बांधण्यात आली आहे.
नालासोपारा पश्चिमेकडे वसई विरार मनपाने सोपारा गाव, सर्व्हे नंबर ३२ मधील हिस्सा नंबर २ मध्ये ४ माळ्याचे हॉटेल बांधण्यासाठी परवानगी दिली होती पण जमीनमालक अनिल राऊत याने बनावट कागदपत्रे, बनावट सीसीच्या आधारे रहिवासी इमारत बांधण्यास विकासकाला तो भूखंड दिला. तसेच सिद्धिविनायक व दिव्या यांना मनपाची कोणतीही परवानगी नसताना बनावट दस्तावेज बनवून व मनपाची बनावट सीसी बनवून विकासकांना बांधण्यासाठी दिली. या प्रकरणानंतर वसई विरार मनपा हद्दीत बिनधास्तपणे बोगस कागदपत्रांच्या साह्याने बनावट सीसी बनवून बांधकामे सुरु असल्याचे पुन्हा निदर्शनास आले आहे.
राजकीय आशिर्वाद असल्याचा आरोप
मनपाच्या नालासोपारा विभागीय कार्यालयातील सहायक आयुक्त शेळके यांनी नालासोपारा पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी जमीनमालक अनिल राऊत आणि इतर ६ बिल्डरांविरोधात गुन्हे दाखल केले असून आरोपी जमीनमालक अनिल राऊत याला अटक केले आहे.
ही बांधकामे करणाºयांवर राजकीय आशीर्वाद असल्या कारणामुळे, मनपा मधील काही अधिकाºयांचे आर्थिक हितसंबंधामुळे मनपा कारवाई करत नसल्याचा आरोप सर्व स्तरातून होत आहे.