विक्रमगडातील अवजड वाहतूक जीवघेणी

By admin | Published: January 22, 2017 02:54 AM2017-01-22T02:54:23+5:302017-01-22T02:54:23+5:30

या शहरातून गेल्या पाच वर्षापासून अवजड वाहतूक सुरूच आहे. अनेकवेळा तक्रारी करुनही ती थांबलेली नाही. त्यामुळे या शहरापासून १ किंमी अंतरावर गडदे ते विक्रमगड

Bulk traffic violation in Vikramgad | विक्रमगडातील अवजड वाहतूक जीवघेणी

विक्रमगडातील अवजड वाहतूक जीवघेणी

Next

विक्रमगड: या शहरातून गेल्या पाच वर्षापासून अवजड वाहतूक सुरूच आहे. अनेकवेळा तक्रारी करुनही ती थांबलेली नाही. त्यामुळे या शहरापासून १ किंमी अंतरावर गडदे ते विक्रमगड असा तांबानदीवरील कमकुवत पूल कोणत्याही क्षणी कोसळण्याचा व सगळी वाहतूकच ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
हा पूल कमकुवत असल्याने त्यावरुन धावणारी अवजड वाहतूक बंद करावी म्हणजे त्याचे आयुष्य वाढेल व किमान हलक्या वाहनांची वाहतूक तरी सुरू राहील अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ करीत आहेत़ त्यानुसार सा़ बां़ विभागाने या पुलावरुन अवजड वाहतुकीस बंदी असल्याचा फलक लावला. मात्र हा बंदी आदेश अमलात आणणारी यंत्रणाच नसल्याने अवजड वाहनांचे चालक तो जुमानत नाही. त्यामुळे अपघातांमध्ये वाढ होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. एका महिन्यामध्ये मोटरसायकल व अवजड ट्रक यांचा अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झालेला आहे़ त्यामध्ये अवघ्या १८ ते २० वयोगटातील आदिवासी तरुणांचा समावेश आहे तरीही याबाबत कुणलाही जाग आलेली नाही.
गेल्या काही वर्षांपासून मनोर व चारोटी अहमदाबाद हायवे वरुन वाहतूक करणारी अवजड वाहने विक्रमगड शहरातून वळविली जात असल्याने तांबाडी नदीवरील कमकुवत पुलाला धोका निर्माण झाला आहे़ त्याचप्रमाणे विक्रमगडच्या मुख्यबाजारपेठेत सकाळी व सायंकाळी वाहतूककोेंडी होऊन प्रदूषणाने नागरिक हैराण झाले आहेत़ त्यामुळे आरोग्याचा पश्नही निर्माण झाला आहे़ ट्रक, टेम्पो, ट्ेलर,सहा-बारा चाकी ट्रक अशा अवजड वाहनांचा यात प्रामुख्याने समावेश आहे़ (वार्ताहर)

हे चालक टोलची रक्कम वाचविण्यासाठी विक्रमगडमार्गे वाहने नेतात. परंतु ग्रामीण भागातील सर्वच रस्ते एकेरी असल्याने सहा व त्यापेक्षा जास्त चाके असणाऱ्या अवजड वाहनांना बंदी आहे. असे असतांनाही हा नाहक त्रास सहन करावा लागत आहे़. यामुळे नागरिकांना वॉकींग करण्यास भीती वाटते आहे.
-अलका भानुशाली, जेष्ठ नागरिक

सकाळी व सायंकाळी या अवजड वाहतुकीमुळे भर नाक्यावर वाहतूककोंडी होत आहे तर अपघाताच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे ही वाहतूक बंद होणे गरजेचे आहे़ - रविंद्र आयरे, विक्रमगड

Web Title: Bulk traffic violation in Vikramgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.