बैलाला इंजेक्शन देऊन मांस तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 01:30 AM2018-12-02T01:30:57+5:302018-12-02T01:31:46+5:30

लोकमान्य नगर येथील निर्मनुष्य भागात गोवंशाला इंजेक्शन मारून बेशुद्धावस्थेत त्यांची हत्या करून त्यांची विक्री करण्याचा प्रकार दक्ष तरुणांनी उघड केला आहे.

Bulla tried to smuggle meat by injection | बैलाला इंजेक्शन देऊन मांस तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला

बैलाला इंजेक्शन देऊन मांस तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला

Next

- हितेन नाईक

पालघर : लोकमान्य नगर येथील निर्मनुष्य भागात गोवंशाला इंजेक्शन मारून बेशुद्धावस्थेत त्यांची हत्या करून त्यांची विक्री करण्याचा प्रकार दक्ष तरुणांनी उघड केला आहे. या प्रकरणी पालघर पोलिसांनी हत्यारे, इंजेक्शनसह स्विफ्ट डिझायर गाडी ताब्यात घेतली आहे.
शुक्र वारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पालघर (पू) जांभळे पाडा येथे राहणारा देवेश भूतकडे हा तरु ण आपल्या मित्रांसह मोटारसायकल वर बसून घराकडे चालला होता. लोकमान्य नगर जवळील बिडको औद्योगिक वसाहतीच्या बाजूला एका निर्मनुष्य भागात एक स्विफ्ट गाडी उभी असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांना संशय आल्याने ते गाडी कडे जात असताना चालकाने गाडी सुरू करून पळण्याचा प्रयत्न केला असता गाडीला अपघात झाला. आणि त्यातील चोरट्यानी गाडीच्या बाहेर उड्या घेत पलायन केले. तरु णांनी तात्काळ पालघर पोलिसांना माहिती दिल्या नंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, पो.नि. पुकळे, सातपाटी सागरी पोलीस स्टेशनचे सहा. पो.नि. जितेंद्र ठाकूर यांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिल्या नंतर स्विफ्ट गाडीत हत्यारे, गार्इंना बेशुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणारे इंजेक्शन, मोबाईल नंबर, खानीवडे टोल नाक्यावर रक्कम भरलेली पावती आदी साहित्य सापडले. या वेळी अत्यंत दाट झाडीत एक गाय अर्धमेल्या अवस्थेत पडल्याचे दिसली. तर बाजूलाच जनावरांचे अवशेष, जमिनीवर पडलेले रक्त आढळून आले. पोलिसांनी या सर्व गोष्टी ताब्यात घेतले असून ते तपासासाठी मुंबईला पाठविण्यात आल्याचे पो.नि. पुकळे यांनी लोकमतला सांगितले. या निर्मनुष्य भागात चरायला आलेल्या गाई ना इंजेक्शन देऊन त्यांची हत्या करून त्याचे मांस गाडीत भरून नेले जात असल्याचा संशय दूध उत्पादकांनी व्यक्त केला आहे. या घटनास्थळा पासून जवळच असलेल्या भडवाड पाडा, जुना पालघर, वळण नाका, या भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अनेक गाई, वासरू चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या कर्सन भरवाड यांच्या ३ गाई, नरेश भरवाड यांच्या २ गाई, लक्ष्मण भरवाड यांच्या ४ गाई व ३ वासरू आणि अजय भरवाड यांच्या २ गाई चोरीला गेल्याचे त्यांनी लोकमत ला सांगितले. या बाबत भाजपच्या पदाधिकारी साईली भानुशाली यांनी वर्षभरापूर्वी पोलीस अधीक्षकांना पत्र देऊनही कारवाई केली जात नसल्याचे सांगितले. या प्रकरणी पालघर पोलीस स्थानकात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
>गाडीच्या मालकांचा शोध सूरु असून ह्या मागे टोळी असण्याच्या दृष्टीनेही तपास केला जात आहे.
- विकास नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी

Web Title: Bulla tried to smuggle meat by injection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.