गुजरातमध्येही बुलेट ट्रेनला अडथळा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 12:35 AM2018-12-08T00:35:13+5:302018-12-08T00:35:21+5:30
आदिवासी एकता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकल्पाला अर्थसहाय्य करणा-या जपान मधील जिका कंपनीच्या पदाधिका-यांना नवसारी (गुजरात) येथे दिला आहे.
पालघर : बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला कुठल्याही परिस्थितीत जमिन मिळणार नाहीत असा निर्वाणीचा इशारा गुजरातच्या खेडूत समाज आणि आदिवासी एकता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकल्पाला अर्थसहाय्य करणा-या जपान मधील जिका कंपनीच्या पदाधिका-यांना नवसारी (गुजरात) येथे दिला आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या मार्गात आणखी आडथळे वाढले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाला शेतकºयांचा दिवसेंदिवस वाढत चाललेला विरोध पाहता जपानचे अधिकारी भारतात दाखल झाले आहेत. जपान इंटरनॅशनल कॉ-आॅपरेशन एजन्सीकडून (जेआयसीए) ह्या प्रकल्पासाठी अल्प दरात व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले होते.
मात्र, गुजरात मधील खेडूत समाज, आदिवासी एकता परिषद, भूमिसेना आदी संघटनांनी या प्रकल्पाला आपला जोरदार विरोध दर्शवीत सर्वेक्षण आणि भूसंपादन करण्यासाठी आलेल्या अधिकाºयांना पिटाळून लावले होते. त्यामुळे शासनाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात दडपशाहीच्या मार्गाने चालू केलेले प्रयत्न शेतकºयांनी एकजुटीने परतावून लावले होते.
या सर्व प्रकारामुळे हा प्रकल्प गुंडाळून ठेवावा लागतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच १८ सप्टेंबर रोजी गुजरात मधील काही शेतकºयांनी थेट जपानच्या जेआयसीए कंपनीला पत्र लिहून भूसंपादन प्रक्रीया कंपनीच्या दिशानिर्देशनानुसार होत नसल्याचे नमूद केले होते. हे भूसंपादन करताना केंद्र सरकार २०१३ सालच्या भूमिअधिग्रहण कायद्याचं सरळ सरळ उल्लंघन करीत असल्याचा आरोप शेतकºयांनी केला होता. या पार्श्वभूमीवर जपानच्या अधिकाºयांनी संबंधित शेतकºयांची भेट घेत या बाबत चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
शुक्र वारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सिमेवर असलेल्या नवसारी जवळील अमदपूर गावात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिका कंपनीच्या शिष्टमंडळाने प्रमुख कात्सुवो माटसुमोरो तर एकता परिषदेचे व भूमिसेनेचे काळूराम धोदडे, राजू पांढरा, शशी सोनावणे, समीर वर्तक, टोनी डाबरे, अभिजित घाग आदीं पदाधिकाºया मध्ये चर्चा झाली.
>संपर्कास सुरुवात
सर्व संघटनांच्या पदाधिकाºयांनी बुलेट ट्रेन ला आपला निर्णायक विरोध दर्शवीत कुठल्याही परिस्थितीत आमच्या जमिनी या प्रकल्पाला देणार नसल्याचे आम्ही सांगितल्याची माहिती शशी सोनावणे यांनी दिली. जपानच्या जिका कंपनीच्या शिष्टमंडळाने नवसारी पासून आपल्या दौºयाला सुरु वात केली असून सुरत दरम्यान काही गावातील बाधित शेतकºयांच्या भेटी घेतल्या जात आहेत. या दरम्यान बुलेट ट्रेनला वाढत जाणारा विरोध पाहता त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न हे शिष्ट मंडळ करीत असल्याचेही सोनावणे यांनी सांगितले.