डहाणू तालुक्यात बुलेट ट्रेनचा विरोध मावळला; स्थानिकांचे सहकार्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 11:34 PM2018-10-09T23:34:16+5:302018-10-09T23:34:55+5:30
पालघर जिल्ह्यात कडाडून विरोध होत असतांनाच, डहाणूच्या चरी, कोटबीबुजड पाडा येथे मात्र जमीन मालकाच्या आणि ग्रामस्थांच्या संमतीने बिनदिक्कतपणे गेल्या दोन दिवसा पासून प्रचंड पोलीस संरक्षणात बुलेट ट्रेनसाठीचे जमीन सर्वेक्षणाचे काम सुरू असून ९७ टक्के मालकांनी या प्रकल्पासाठी जमीन देण्यास संमंत्ती दिली आहे.
डहाणू : पालघर जिल्ह्यात कडाडून विरोध होत असतांनाच, डहाणूच्या चरी, कोटबीबुजड पाडा येथे मात्र जमीन मालकाच्या आणि ग्रामस्थांच्या संमतीने बिनदिक्कतपणे गेल्या दोन दिवसा पासून प्रचंड पोलीस संरक्षणात बुलेट ट्रेनसाठीचे जमीन सर्वेक्षणाचे काम सुरू असून ९७ टक्के मालकांनी या प्रकल्पासाठी जमीन देण्यास संमंत्ती दिली आहे.
डहाणू तालुक्यातील १६ गावे बुलेटट्रेनमुळे बाधित होणार असून, त्यापैकी चरी, कोटीबी, बाणि आसवे, गावांत या पूर्वीच सीमांकन करण्यात आले होते, त्याप्रमाणे सोमवारी कोटीबी बुजडपाडा येथे बुलेट ट्रेनचे सिनिअर व्यवस्थापक एन.डी.वाघ जनसंपर्क अधिकारी तुषार पाटील, यांच्या उपस्थितीत डहाणूचे भूमिअभिलेख अधिकारी, बुलेट ट्रेन प्रकल्पातील सर्वेचे पथक यांनी प्रचंड पोलीस संरक्षणात सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात केली असून, दोन दिवसांत एक किलोमीटरचा सर्व्हे करण्यात आला आहे.
ज्या जमीन मालकांनी स्वखुशीने बुलेट ट्रेनला जमीन देण्यास संमती दिली आहे, त्यांच्याच जमिनीचे सर्वेक्षण करण्यात येत असून, ज्या जमीन मालकांनी संमती दिलेली नाही, किंवा विरोध दर्शविलेला आहे, त्यांच्या जमिनीचे सर्वेक्षण केले जाणार नाही, असे बुलेटट्रेनचे सिनिअर व्यवस्थ्यापक एन,डी, वाघ, यांनी सांगितले.
शेतकऱ्याकडून संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला सरकारी नियमाप्रमाणे पाच पट दिला जाणार असून, ९७ टक्के शेतकºयानी संमती दिली आहे. - एन , डी, वाघ, बुलेटट्रेन सिनिअर, व्यवस्थापक
कोटबी गावांतील सर्व शेतकरी बुलेटट्रेनसाठी जमीन देण्यास तयार आहेत, मात्र बाहेरगावचे लोक येऊन आम्हास दमदाटी करतात.
- विक्र म शिंगडा, जमीन मालक
बुलेटट्रेनसाठी जमीन देण्यास आम्ही तयार असून,आमच्या जमिनीचे सर्वेक्षण करण्यास आमची कोणतीच हरकत नाही.
- सुमन सुनील शिंगाडा, जमीनमालक