एक बंधारा तोडून त्याच जागेवर नव्या बंधाऱ्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 11:29 PM2019-03-01T23:29:08+5:302019-03-01T23:29:15+5:30

शासनाचे नियम धाब्यावर : कृषी विभागाचे लाखो रुपये पाण्यात

A bundle of work and a new bargain at that place | एक बंधारा तोडून त्याच जागेवर नव्या बंधाऱ्याचे काम

एक बंधारा तोडून त्याच जागेवर नव्या बंधाऱ्याचे काम

Next

वाडा : तालुक्यातील खरिवली येथे पंचायत समितीच्या पाटबंधारे विभागाकडून एक बंधारा बांधण्यात आला होता. तो नियमबाह्य पद्धतीने पाडून त्याच जागेवर कृषी विभागाकडून पंधरा लाखाचा निधी मंजूर करून हे काम पार्वती मजूर कामगार सोसायटीला देण्यात आले असून या ठेकेदार एजन्सीने नवीन बंधाऱ्याच्या कामाला सुरु वात केली आहे. त्यामुळे शासनाचा लाखोंचा निधी पाण्यात गेला आहे.


बंधारा पाडताना पाटबंधारे विभागाची रितसर परवानगी घेणे बंधनकारक होते. शिवाय त्या ग्रामपंचायतीची परवानगी घेण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांना देखील विचारात न घेता केवल ठेकेदार चे हित जोपासण्यासाठी अधिकाºयांशी हातमिळवणी करून परस्पर नियमबाह्य पद्धतीने एक बंधारा तोडून त्याच जागेवर कृषी विभागाने नवीन काम सुरू केल्याने त्यांचा हा भोंगळ कारभार समोर आला आहे.


प्र्रशासनाची दिशाभूल करून शासनाचा लाखो रु पयांचा निधी पाण्यात घालविण्याचे काम करणारे कृषी विभागाचे अधिकारी संबंधित ठेकेदार यांची सखोल चौकशी करून प्रशासनाचा वाया गेलेला निधी त्यांच्याकडून वसूल करून शासनाचा तिजोरीत जमा करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

Web Title: A bundle of work and a new bargain at that place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.