घरफोडी, चोरी करणाऱ्या चौकडीला अटक, लाखोंचा मुद्देमाल केला पोलिसांनी हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 07:17 PM2023-12-20T19:17:39+5:302023-12-20T19:17:53+5:30

वालीवच्या स्पेस हाईट या इमारतीत राहणारे अभिजित ठाकूर (२८) यांचे सातीवलीच्या सागर प्लाझा इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये लिओनिक्स लाईटिंग सोल्युशन नावाची एलईडी लाईट मॅन्यूफॅक्चरिंग कंपनी आहे.

Burglary, stealing four arrested, goods worth lakhs seized by police | घरफोडी, चोरी करणाऱ्या चौकडीला अटक, लाखोंचा मुद्देमाल केला पोलिसांनी हस्तगत

घरफोडी, चोरी करणाऱ्या चौकडीला अटक, लाखोंचा मुद्देमाल केला पोलिसांनी हस्तगत

मंगेश कराळे -

नालासोपारा - घरफोडी, चोरी करणाऱ्या चार जणांच्या टोळीला वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून ६ लाखांचे एलईडी लाईट व एलईडी लाईट बनविण्यासाठी लागणारे साहीत्य आणि ७ लाखांची कार असा एकूण १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी बुधवारी दिली आहे.

वालीवच्या स्पेस हाईट या इमारतीत राहणारे अभिजित ठाकूर (२८) यांचे सातीवलीच्या सागर प्लाझा इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये लिओनिक्स लाईटिंग सोल्युशन नावाची एलईडी लाईट मॅन्यूफॅक्चरिंग कंपनी आहे. १३ डिसेंबरला रात्री चोरट्यांनी १ लाख ९८ हजार ५०५ रुपये किंमतीचे एलईडी लाईट व रॉ मटेरियल चोरून नेले होते. याप्रकरणी वालीव पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. 

सदर गुन्हयाचे तपासाचे अनुषगांने तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तसेच मिळालेल्या माहीतीच्या आधारे तपास करत चौघांना ताब्यात घेतले. वालीव गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तपास करत आरोपी विरेंद्र राधेश्याम सोनी (२७), मफीजुल शमशुददीन शेख (४१), भेैरवलाल नथुलाल पटेल (२३) आणि सनाऊल्ला कलाम शेख (३३) या चारही जणांना अटक केले आहे. तिन्ही आरोपींनी भंगार विक्रीचा व्यवसाय करणारे सनाऊल्ला कलाम शेख यांना नळ बाजार, मुंबई येथे विक्री केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. तसेच यापुर्वी देखील या कंपनीतील मालाची चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वर दाखल गुन्हयातील चोरीस गेलेले व यापुर्वी देखील चोरी केलेले एलईडी लाईट व एलईडी लाईट लाईट बनविण्यासाठी लागणारे साहीत्य असा ६ लाख १ हजार ११९ रुपये किंमतीचा मुद्देमाल आणि ७ लाख रुपये किंमतीची गुन्हा करतेवळी वापरलेली हयुडांई एक्सेन्ट कार असा एकुण १३ लाख १ हजार १९९ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

वरील कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांचे मार्गदर्शनाखाली वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जिलानी सय्यद, गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस हवालदार मुकेश पवार, मनोज मोरे, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, सतीश गांगुर्डे, बाळु कुटे, विनायक राऊत, अभिजीत गढरी यांनी पार पाडली आहे.
 

Web Title: Burglary, stealing four arrested, goods worth lakhs seized by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.