वसईतील विजेचे खांब जीवघेणे; जबाबदारी कुणाची? हेच निश्चित नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 11:07 PM2019-06-06T23:07:15+5:302019-06-06T23:07:29+5:30

अचोळेतील भूमीगत वाहिन्यांसाठी ७९ कोटी

Burning power pillars in Vasai; Who is the responsibility? That's not the case | वसईतील विजेचे खांब जीवघेणे; जबाबदारी कुणाची? हेच निश्चित नाही

वसईतील विजेचे खांब जीवघेणे; जबाबदारी कुणाची? हेच निश्चित नाही

Next

विरार : वसई विरार शहर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना याठिकाणी सर्वत्र विकास पाहायला मिळत आहे. हल्लीच रस्त्यांचे रुंदीकरण झाल्याने रस्त्यावर विजेचे खांब असणे साहजिक आहे. परंतु हे विजेचे खांब असेच रस्त्यावर पडलेले असल्यामुळे नागरीकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहेच परंतु याच सोबत अपघात होण्याची शक्यता देखील वाढली आहे.

वसई विरार शहरात तसेच ग्रामीण भागात धोकादायक रोहित्रे आहेत. तसेच काही ठिकाणी वीज तारा देखील धोकादायक झाल्या असून रोहित्रे देखील उघडी आहेत. या सर्व समस्यांचे निराकरण पावसाळ्यापूर्वी करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आताच कामे सुरू करून पूर्ण केल्यास पावसाळ्यात अखंडित वीजपुरवठा होऊ शकतो.

शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता वितरण व्यवस्था अधिक सक्षम व सुरक्षित करावी त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी सुरक्षेचे उपाय करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. पावसाळ्या आधी सर्व काम पूर्ण व्हावे यासाठी विरार विभागातील दिवाबत्ती, वीजवितरण विषयक समस्यांचा आढावा घेण्यासाठी विविध बैठकी घेण्यात आल्या त्यात अनेक सूचना नगरसेवकांनी केल्या. यात काही विजेचे खांब खालून सडले असून वायरींचा एकमेकांना स्पर्श होत असल्याने ठिणग्या उडतात. या तक्रारींचा समावेश होता. ज्याठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे त्याठिकाणची रोहित्रे व खांब स्थलांतरित करण्यात आले आहेत. रस्त्यातील विजेचे खांब, रोहित्रे हटविण्याचे काम महापालिका अथवा महावितरण यापैकी कुणी करायचे हे अद्याप ठरलेले नाही.

वसई ते पापडी, जूचंद्र, नालासोपारा येथील आचोळे या भागात भूमिगत केबल टाकण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी ७९ कोटींचे अंदाजपत्रक आहे. हे काम मंजूर असून जूनपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. -अरूण पापडकर, अधीक्षक अभियंता, महावितरण

Web Title: Burning power pillars in Vasai; Who is the responsibility? That's not the case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.